एक्स्प्लोर
दिल्लीतील तरुणीच्या हत्येचं गूढ उकललं!
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीला हादरवून टाकणाऱ्या बुराडी हत्याकांडात नवा खुलासा झाला आहे. या हत्येमागचं कारण एकतर्फी प्रेम नव्हतं. मृत तरुणी आणि आरोपीमध्ये अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र काही दिवसांपासून तरुणी आरोपीला टाळत होती. त्यामुळे त्याने तरुणीला संपवल्याचं समजतं.
दिल्लीच्या बुराडी भागात काल (मंगळवार) भर रस्त्यात करुणावर तब्बल 30 हून अधिक वार केले होते. मृत करुणा 22 वर्षांची होती तर आरोपी सुरेंद्र 32 वर्षांचा आहे.
मैत्री आणि नंतर प्रेम
पोलिसांच्या तपासात समोर आलं की, करुणा आणि सुरेंद्र 2012 पासून एकमेकांना ओळखत होते. तेव्हा करुणा सुरेंद्रच्या एका कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये शिकायला जात होती. तिथेच त्यांची मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघे एकत्र फिरत असत. इतकंच नाही तर करुणाने तिच्या फेसबुक वॉलवर दोघांचा फोटोही पोस्ट केला होता.
भर रस्त्यात तरुणीची हत्या, चाकूने 30हून अधिक वार
फेसबुक चॅटमुळे संशय बळावला मात्र काही दिवसांपासून करुणा सुरेंद्रला टाळत होती. सुरेंद्रकडे करुणाच्या फेसबुक अकाऊंटचा पासवर्ड होता. यादरम्यान सुरेंद्रने करुणाचा एक न्यूड फोटो पाहिला होता, जो तिने दुसऱ्याच एका मुलाला पाठवला होता. यासोबतच त्याने करुणाचं दुसऱ्या मुलासोबतचं चॅट वाचलं होतं. यामुळे सुरेंद्र अतिशय संतापला होता. सुरेंद्रने मंगळवारी सकाळी करुणाला जीटीबी नगर मेट्रो स्टेशनवर भेटण्यासाठी बोलावलं होतं. तिथे दोघांमध्ये वाद झाला. यानंतर करुणा तिथून निघून गेली. यावेळी तिच्यासोबत तिची चुलत बहिणही होती. यावेळी सुरेंद्र बाईकवरुन त्यांच्या पुढे निघून गेला. त्या दोघींआधी तो बुराडीच्या लेबर चौकात पोहोचला. तिथे त्याने करुणावर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली. ही संपूर्ण घटना चौकात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. नागरिकांनी आरोपी सुरेंद्रला पकडून बेदम चोप दिला. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement