(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gyanvapi Mosque : मशिदीत सापडलेल्या कथित शिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणं भोवलं; दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापकाला अटक
Gyanvapi Mosque : दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक यांनी ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या कथित शिवलिंगाचे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट करताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.
Gyanvapi Mosque : वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आल्यानंतर दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक रतन लाल यांनी सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी त्यांना शुक्रवारी रात्री अटक केली आहे. उत्तर जिल्ह्यातील सायबर सेलमध्ये दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक रतन लाल यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
कथित शिवलिंगाचे वादग्रस्त छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट, आक्षेपार्ह वक्तव्य भोवलं
दिल्ली विद्यापीठातील हिंदू कॉलेजमधील प्राध्यापक रतन लाल यांनी ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या कथित शिवलिंगाचे वादग्रस्त छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट करताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावण्याच्या उद्देशाने केलेल्या या पोस्टविरोधात एका वकिलाने उत्तर जिल्ह्यातील सायबर सेलमध्ये एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणी शुक्रवारी सायंकाळी उशिरा प्राध्यापक रतन लाल यांना अटक करण्यात आली आहे.
प्राध्यापक रतन लाल हे हिंदू महाविद्यालयात इतिहास विभागाचे प्राध्यापक
हे प्रकरण समोर येताच प्राध्यापकावर कारवाईसाठी मागणी करण्यात आली, तेव्हा प्राध्यापकाने त्यांची पोस्टही हटवली होती. प्राध्यापक रतन लाल हे हिंदू महाविद्यालयात इतिहास विभागाचे प्राध्यापक आहेत. दुसरीकडे, ज्ञानवापी मशिदीमध्ये कथितरित्या सापडलेल्या शिवलिंगासारखी रचना अनेक मुस्लिम संघटनांनी कारंजे म्हणून वर्णन केली आहे.
जिल्हा न्यायाधीशांची बदली
सध्या ज्ञानवापी प्रकरणात वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांची बदली करण्यात आली आहे. हा आदेश देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, या खटल्याची गुंतागुंत लक्षात घेऊन ते अधिक अनुभवी न्यायाधीशांकडे पाठवले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आता जिल्हा न्यायाधीश या प्रकरणाशी संबंधित सर्व खटले आणि अर्जांची सुनावणी करतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :