एक्स्प्लोर

Delhi-Mumbai Expressway : आता दिल्ली ते मुंबई अवघ्या 12 तासात पोहोचणार! पेट्रोलची होणार बचत, 70% काम पूर्ण

Delhi-Mumbai Expressway : हा एक्स्प्रेस वे तयार झाल्यानंतर दिल्ली-मुंबई अंतर कमी होणार असून प्रवासाचा वेळही कमी होणार आहे.

Delhi-Mumbai Expressway : दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचे 70% काम पूर्ण झाले आहे, फक्त 30% काम बाकी आहे. हा एक्स्प्रेस वे (Express Way) तयार झाल्यानंतर दिल्ली-मुंबई अंतर कमी होणार असून प्रवासाचा वेळही कमी होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एका कार्यक्रमात दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गाच्या प्रगतीची माहिती दिली. ते म्हणाले की, मुंबई ते दिल्लीच्या नरिमन पॉइंट्स दरम्यान अखंड कनेक्टिव्हिटीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे हरियाणातील राजीव चौक, गुरुग्राम येथून सुरू होईल आणि मेवात, जयपूर कोटा, भोपाळ, अहमदाबाद मार्गे मुंबईला जाईल.

आता 20 ऐवजी 12 तास लागतील
रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, दिल्ली ते मुंबई जाण्यासाठी 20 तासांऐवजी केवळ 12 तास लागतील. त्यामुळे द्रुतगती मार्गावरून लोकांना त्यांच्या खासगी वाहनांनी सहज जाता येणार आहे. यामुळे त्यांचा वेळ तर वाचेलच, पण लोकांचे ट्रेन आणि फ्लाइटवर अवलंबून राहणे देखील कमी होईल. पुढील वर्ष 2023 पासून या एक्स्प्रेस वेवर वाहनांची रहदारी पूर्ण होऊ शकेल. 1350 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाची किंमत सुमारे 1 लाख कोटी रुपये आहे. 

जानेवारी 2023 पर्यंत हा एक्स्प्रेस वे तयार करण्याचे लक्ष्य
सध्या दिल्ली-मुंबई रस्त्यापासून 1450KM अंतर आहे. एक्स्प्रेस वेपासून हे अंतर 1350 पर्यंत कमी होणार आहे. जानेवारी 2023 पर्यंत हा एक्स्प्रेस वे तयार करण्याचे लक्ष्य आहे. मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वेचा विस्तार जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टपर्यंत (JNPT) करण्यात येणार आहे. 1350 किमी लांबीचा एक्स्प्रेस वे सुरू झाल्यानंतर दररोज 8.76 लाख लिटर आणि वर्षाला सुमारे 320 दशलक्ष लिटर पेट्रोलची बचत होणार आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या एक्स्प्रेस वेवरून माल वाहतुकीचा खर्च कमी होणार आहे. अशा प्रकारे, एक्सप्रेसवे आणि जवळपासच्या शहरांमध्ये लॉजिस्टिक खर्चात 8 ते 9% ची बचत होईल.

12 लेन महामार्ग
नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, एक्स्प्रेस वे अशा प्रकारे तयार केला जाईल की, गरज भासल्यास त्याचे 8 लेनवरून 12 लेनमध्ये सहज रुपांतर करता येईल. 1350 किलोमीटरचा हा एक्सप्रेसवे 20 किलोमीटर राखीव जंगलातून जाणार आहे. म्हणजेच झाडे तरी तोडावी लागतील.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
Embed widget