एक्स्प्लोर

कोर्ट परिसरात गँगस्टरची गोळ्या घालून हत्या, वकिलाच्या वेशात आलेल्या शूटर्सचंही एन्काऊंटर, दिल्लीतील खळबळजनक घटना

दिल्लीतल्या रोहिणी कोर्ट (Delhi Rohini Court) परिसरात झालेल्या गँगवॉरमध्ये जितेंद्र गोगी नावाच्या गुन्हेगाराची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोर शूटर असून ते वकिलाच्या वेशात आले होते.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. दिल्लीतल्या रोहिणी कोर्ट  (Delhi Rohini Court) परिसरात झालेल्या गँगवॉरमध्ये जितेंद्र गोगी (jitendra gogi) नावाच्या गुन्हेगाराची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोर हे टिल्लू गँगचे शूटर असून ते वकिलाच्या वेशात आले होते. जितेंद्र गोगीवर गोळी झाडणाऱ्या दोघांचा दिल्ली पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. या घटनेत चार ते पाच जण जखमी झाले असल्याची देखील माहिती आहे. 

माहितीनुसार दिल्लीतील रोहिणी कोर्टात गॅंगस्टर  जितेंद्र गोगीला सुनावणीसाठी आणण्यात आलं होतं. यावेळी वकिलाच्या वेशात आलेल्या शूटर्सनी त्याच्यावर गोळीबार केला. यात त्याचा जागेवर मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरात कारवाई करत शूटर्सचा एन्काऊंटर केला. ही घटना रोहिणी कोर्टाच्या रूम नंबर-207 मध्ये घडली. या शूटआऊट मध्ये चार ते पाच जण जखमी झाले असून त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे.  

पोलिस सूत्रांचं म्हणणं आहे की, एन्काऊंटर मध्ये टिल्लू गॅंगच्या दोघांचा खात्मा करण्यात आला आहे. हे दोघे वकिलांचा ड्रेस घालून रोहिणी कोर्टात आले होते. यांनीच जितेंद्र गोगीला गोळी मारली. टिल्लू गॅंगच्या या दोघांची नावं अद्याप समोर आलेली नाहीत. पोलिसांनी सांगितलं की, गँगस्टर गोगी आणि टिल्लू गॅंगमधील पूर्व वैमनस्यातून ही घटना घडली आहे. दरम्यान कोर्टाच्या परिसरात भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळं एकच खळबळ उडाली असून पोलिस प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे.  

कोण होता जितेंद्र गोगी
जितेंद्र गोगी हा दिल्लीतील टॉप मोस्ट गॅंगस्टर होता. दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर 4 लाखांचा इनाम ठेवला होता. तर हरिणाया पोलिसांनी देखील गोगीवर अडीच लाखांचा इनाम ठेवला होता. दिल्लीच्या नरेला परिसरात एक स्थानिक नेता  वीरेंद्र मान यांच्या हत्याकांडात जितेंद्र गोगी आणि त्याच्या गॅंगचा सहभाग होता.  जितेंद्र उर्फ गोगी वर हरियाणाची प्रसिद्ध सिंगर हर्षिता दाहियाच्या हत्येचा देखील आरोप होता. दिल्ली आणि हरियाणा राज्याची पोलिस गँगस्टर गोगीचा शोध घेत होते.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHASaif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Embed widget