एक्स्प्लोर

Delhi Ordinance 2023:  दिल्ली अध्यादेशाचं विधेयक आज लोकसभेत सादर होणार, संसदेत पुन्हा गदारोळ होण्याची शक्यता

Parliament Monsoon Session: केंद्र सरकारने या वर्षी मे महिन्यामध्ये दिल्लीमध्ये अधिकाऱ्यांच्या बदली आणि पोस्टिंगसंदर्भात एक अध्यादेश काढला होता. पण आपचे सरकार या अध्यादेशाचा विरोधात आहे.

Delhi Ordinance 2023:  दिल्लीमधील (Delhi) अधिकाऱ्यांच्या बदली पोस्टिंगसदर्भात केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाशी संबंधित विधेयक मंगळवार (1 ऑगस्ट) रोजी लोकसभेत (Loksabha) सादर केले जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे विधेयक सादर करणार आहेत. पण दिल्लीत सत्तेत असलेला आप (AAP) पक्ष सुरुवातीपासूनच या अध्यादेशाच्या विरोधात आहे. तसेच इतर विरोधी पक्षांकडून त्यांनी या अध्यादेशाला विरोध करण्यासाठी समर्थन देखील मागितले आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी याबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समर्थन देण्याचे आश्वासन दिले आहे. 

'आप'ची सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव

या प्रकरणात दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालायात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील सर्व अधिकार दिल्ली सरकारला दिले आहेत. हा अध्यादेशी जारी करण्यात आल्या नंतर आपने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. त्यानंतर कोर्टाने हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग केले आहे. 

अरविंद केजरीवाल यांनी या विधेयकाला राज्यसभेत विरोध करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, शरद पवार, टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी, डीएमकेचे प्रमुख एम.के स्टॅलिन यांच्यासह अनेक विरोधीकडून समर्थन मागितले होते. त्यामुळे विरोधी पक्षांची एकजूट असलेला इंडियामधील सर्व विरोधी पक्ष या अध्यादेशाच्या विरोधात आहेत. 

विधेयकाला मंजूरी देण्यासाठी एनडीएला या पक्षांची गरज

एनडीएला राज्यसभेत हे विधेयक मंजूर करण्यासाठी बीजेडी, वाईएसआर काँग्रेस पक्ष, नामनिर्देशित सदस्य आणि राज्यसभेतील अपक्ष सदस्यांच्या पाठिंब्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. लोकसभेत मात्र एनडीएची स्थिती चांगली आहे. तसेच एनडीए आणि विरोधी पक्षांची आघाडी असेलेल्या इंडियाचे राज्यसभेत समान खासदार आहेत. 

'या' पक्षांच्या समर्थनावर सगळ्यांच्या नजरा

28 खासदारांपैकी बीआरएस पक्षाच्या सात सदस्यांनी विरोधी पक्षांसोबत मतदान करण्याची अपेक्षा आहे. बीजेडी आणि वायएसआर काँग्रेसचे प्रत्येकी 9 सदस्य आहेत आणि एनडीए त्यांच्या समर्थनावर अवलंबून आहे.जेडीएस आणि टीडीपीचे राज्यसभेत प्रत्येकी एक खासदार आहेत. या पक्षांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. 

दरम्यान आता लोकसभेत सादर होणाऱ्या या अध्यादेशाला कोणते पक्ष पाठिंबा देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. तसेच राज्यसभेत एनडीएचे 101 खासदार आहेत आणि इंडियाचे 100 खासदार आहेत. त्यामुळे आता या अध्यादेशाच्या विरोधात विरोधी पक्षांची एकजूट होणार की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. तर या अध्यादेशासाठी सरकारला समर्थन मिळणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. 

हेही वाचा : 

Haryana: हरियाणात दोन गटात झालेल्या हिंसाचारात दोन होमगार्डचा मृत्यू; परिस्थिती नियंत्रणात, जिल्ह्यात कलम 144 लागू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget