(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shraddha Walker murder case: आफताबच्या नार्को टेस्टमुळे नेमकं काय उघड होणार?
Delhi Murder Case Updates: संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याची लवकरच नार्को टेस्ट होणार आहे.
Delhi Murder Case Updates : सातत्याने आपल्या जबाब बदल करणाऱ्या आस्थापनावालाच सत्य आता लवकरच समोर येणार आहे. कारण कोर्टाने आफताबची नार्कोटेस्ट करायला परवानगी दिली आहे. गुरुवारी दिल्ली कोर्टानं अफताब पूनावाला याला पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, त्याशिवाय नार्को टेस्टला परवानगी दिली आहे.
संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याची लवकरच नार्को टेस्ट होणार आहे. नुकतंच त्याला कोर्टामध्ये हजर केला असता कोर्टाने त्याला पाच दिवसांची पोलीस कस्टडी देताना नार्को टेस्ट करायला देखील पोलिसांना परवानगी दिली आहे. मागील चार दिवसांपासून पोलिसांच्या तावडीत असूनही आफताब श्रद्धाच्या हत्येची मिस्ट्री उलगडून देत नव्हता. सध्या पोलिसांच्या हातात केवळ परिस्थितीजन्य पुरावे आहेत. पण पोलिसांनी ही तपासाची चक्रे वेगाने फिरवून महत्त्वाचे धागेदोरे शोधायला सुरुवात केली आहे. त्यातच नार्को टेस्ट करायची परवानगी मिळाल्यामुळे पोलिसांना याचा तपास करताना आणखी फायदा होणार आहे
नार्को टेस्टमुळे कोणत्या गोष्टी उघड होणार?
1) आरोपीने खुनाची कबुली दिली मात्र पुरावे कशाप्रकारे मिटवले याची माहिती मिळेल
2) जर फ्रीजमध्ये शरीराचे तुकडे करून ठेवले असतील तर ते पुरावे कसे मिटवले
3) घरात ठिकठिकाणी पडलेले रक्ताचे डाग कशाप्रकारे मिटवले, कोणत्या केमिकलचा वापर केला कोणती सिरीज पाहिली, कोणती पुस्तक वाचली
4) बेडवर जर श्रद्धाला मारल असेल तर ती चादर आणि बेडला लागलेले रक्ताचे डाग कसे मिटवले
5) शरीराचे तुकडे करण्यासाठीं ज्या दुकानातून सुरा घेतला त्याचा पत्ता समोरं येईल
6) आत्तापर्यंत जे कबुली जबाबात सांगितल ते खरं आहे का हे तपासता येईल
सूत्रांच्या माहितीनुसार श्रद्धाची हत्या करून त्याचे तुकडे केल्यानंतर रक्ताने माखलेले बाथरूम धुण्यासाठी आफताब ने अमाप पाण्याचा वापर केल्याचा समोर आहे. दिल्लीमध्ये प्रत्येक घराला वीस हजार लिटर पाणी मोफत आहे. त्यामुळे दिल्लीतल्या बहुतांश घरांमध्ये पाण्याचे बिल येत नाही, पण गेल्या पाच महिन्यांमध्ये आत्ताच्या फ्लॅटमध्ये पाण्याचे बिल तीनशे रुपये आलं होतं. म्हणजे आफताबने जे पाणी वापरलं तेच त्याच्याविरोधात पुरावा बनले आहे. आता पोलिसांना केवळ आफताबने आत्तापर्यंत ज्या बाबी सांगितल्या त्यामध्ये श्रद्धाने लग्नासाठी तगादा लावला होता पासून ते दिल्लीतील कोण कोणत्या भागात श्रद्धाच्या शरीराचे तुकडे फेकले ते नार्कोटेस्टमुळे उघड व्हायला मदत होणार आहे आणि त्याच्याच मदतीने अफताबला लवकरात लवकर फाशीच्या तक्त्या पर्यंत न्यायला मदत होणार आहे.