दिल्ली-मुंबई विमान, रेल्वे सेवा बंद होणार? राजधानीत वाढत्या कोविड रुग्णसंख्येमुळे निर्णय घेण्याची शक्यता
दिल्ली ते मुंबई दरम्यान विमान आणि रेल्वे सेवा बंद करण्याची शक्यता. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार याचा विचार करीत आहे.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत कोविड -19 च्या वाढत्या रुग्णसंख्येचा परिणाम दिल्ली-मुंबई विमान आणि रेल्वे सेवांवरही होऊ शकतो. दिल्ली ते मुंबई दरम्यान विमान आणि ट्रेनच्या वाहतुकीवर बंदी घातली जाऊ शकते. ठाकरे सरकार याचा विचार करीत आहे. महाराष्ट्र सरकारने या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु, माध्यमांच्या वृत्तानुसार राज्य सरकार लवकरच याबाबत निर्णय घेऊ शकेल. राजधानीत कोविड -19 च्या वाढत्या घटनांमुळे ठाकरे सरकार असे पाऊल उचलण्याचा विचार करीत आहे.
मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहेल काल दिल्लीत होते. दिल्लीतील कोरोना बाधित रुग्ण संख्या वाढत आहे. तिथली परिस्थिती मुंबई आयुक्त इकबाल चहल यांनी पाहिली. आयुक्त इकबाल चहल यांनी दिल्लीची परिस्थिती मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांना देखील सांगितली. दिल्लीतील रुग्ण संख्या वाढत असताना दिल्ली मुंबई विमानसेवा आणि रेल्वे सेवा तात्पुरती थांबवता येईल का अशी चर्चा झाली. दिल्लीमुळे मुंबईत रुग्णसंख्या वाढण्याची भीती असल्यामुळे ही या सेवा बंद करण्याची शक्यता आहे. एकूणच इकबाल चहल यांची दिल्लीवरी मुळे एक निर्णय आणि दुसऱ्या निर्णयाची चर्चा सुरू झालीशुक्रवारी दिल्लीत कोरोना संक्रमित 7500 नवीन रुग्णांची नोंद झाली. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की दिल्लीत वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूमुळे त्याचा थेट परिणाम एनसीआरसह हरियाणा आणि राजस्थानात दिसून येत आहे, जेथे कोरोनाचे प्रमाण वाढत आहे.
राजधानी दिल्लीत वाढत्या कोरोना प्रकरणामुळे दिल्ली सरकारने मास्क न घातल्यास दंडाची रक्कम 500 रुपयांवरून दोन हजार रुपयांपर्यंत वाढविली आहे. दिल्लीत शुक्रवारी डोर-टू-डोर सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सर्व्हेक्षणात 13-14 लाख घरांमध्ये दिल्ली सरकारची आरोग्य विभागाची पथकं जाणार आहेत. दिल्लीतील 11 जिल्ह्यांमधील सुमारे 57 लाख लोकांचे सर्व्हेक्षण केले जाईल. यात संशयास्पद लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यासाठी उपयोग होणार आहे.
प्रत्येक सर्व्हेक्षण पथकात 2-5 लोक असतील. एकूण 9500 टीम असणार आहेत. दाट लोकवस्ती व कंटेन्टमेंट झोनमध्ये राहणाऱ्या लोकांचे सर्व्हेक्षण केले जाणार आहे. सद्यस्थितीत, दिल्ली सरकार एका कोरोना पॉजिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 16 जणांचे फोनवर ट्रेसिंग करत आहेच. या टीमला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग फेस-टू-फेसू करावे लागणार आहे.
Mumbai Schools Reopen Postponed | मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार!
जिथे संक्रमण आणि संपर्कांची संख्या जास्त आहे अशा दाट लोकवस्ती असलेल्या भागात जलद अँटीजेन चाचण्या घेण्याची जबाबदारी या पथकांवर असणार आहे. अँटीजेन टेस्ट केल्यानंतर निगेटिव्ह आलेल्या लोकांची आरटी-पीसीआर चाचणी देखील करायची आहे. घरात आयसोलेशनमध्ये लोकं नियमांचे पालन करतात का? याचीही तपासणी या पथकांना करायची आहे.
Mumbai-Delhi Air and Railway Service | दिल्ली-मुंबईदरम्यान विमान, रेल्वे सेवा बंद होण्याची चिन्ह