Delhi MCD Election 2022 : दिल्ली महापालिकेसाठी आज मतदान; निवडणुकीकडे देशाचे लक्ष
Delhi MCD Election 2022 : आज दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीसाठी (Delhi Municipal Corporation) आज मतदान होणार आहे. दिल्ली महापालिकेची मुदत त्यानंतर एप्रिलमध्ये संपली होती.
Delhi MCD Election 2022 : आज दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीसाठी (Delhi Municipal Corporation) आज मतदान होणार आहे. दिल्ली महापालिकेची मुदत त्यानंतर एप्रिलमध्ये संपली होती. दिल्ली महानगरपालिकेसाठी आज चार डिसेंबर रोजी मतदान होत आहे, तर सात डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
एमसीडी अर्थात दिल्ली महानगरपालिका निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागून आहे. दिल्ली महापालिकेत एकूण जागा 250 जागा आहेत, यामधील 42 जागा आरक्षित आहेत. यापूर्वी दिल्लीत 3 महापालिका होत्या मात्र आता केंद्र सरकारने तिन्ही महापालिकांची मिळून 1 महापालिका केली आहे.
यंदाच्या निवडणुकीत भाजप, आप आणि कॉंग्रेस या 3 प्रमुख पक्षांमध्ये लढत
तिन्ही मनपांवर सध्या भाजपची सत्ता आहे. तर दिल्लीमध्ये आपची सत्ता आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप, आप आणि कॉंग्रेस या 3 प्रमुख पक्षांमध्ये लढत होत आहे. दिल्ली मुन्सिपल अॅक्ट, 1957 या कायद्यान्वये दिल्लीत 2012 साली महापालिकेचे विभाजन करण्यात आले आणि एक ऐवजी तीन महापालिका निर्माण झाल्या. गेल्या पंधरा वर्षांपासून दिल्लीच्या तीनही महापालिकेत भाजपची सत्ता आहे.
नव्या एकत्रित महापालिकेत 250 वॉर्ड
दिल्लीत आधी तीन महापालिकांमध्ये मिळून आधी 272 वॉर्ड होते, नव्या एकत्रित महापालिकेत ही संख्या कमी होऊन 250 वॉर्ड इतकी करण्यात आली आहे.. दिल्लीच्या तीनही महापालिका गेली 10 वर्षे भाजपच्या ताब्यात होत्या. दिल्लीत सलग दुसऱ्यांदा सरकार बनवल्यानंतर केजरीवाल आता दिल्ली महापालिकाही नजर ठेवून आहेत.
आम आदमी पक्षाची दिल्लीत दुसऱ्यांदा आणि पंजाबमध्ये अल्पावधीत सत्ता आल्यानंतर आता दिल्ली महापालिका टिकवणे हे भाजपासाठी मोठं आव्हान आहे. आपकडून भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळं भाजप जुन्या उमेदवारांना बाजूला सारुन नव्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.
सध्या दिल्लीमध्ये चर्चेत असलेले मुद्दे
प्रदूषणाचा मुद्दा, दारु दुकानं आणि विक्रीमध्ये झालेले बदल, यमुना नदी प्रदूषण, दिल्लीमधील शैक्षणिक व्यवस्था, दिल्लीमधील वाहतूकीची होणारी कोंडी
गुजरात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे, त्यामुळं केजरीवाल यांच्या समोर गुजरात आणि दिल्लीचं एकाचवेळी आव्हान समोर होतं. त्यामुळं केजरीवालांचा आप या निवडणुकीत कितपत बाजी मारतो याकडे लक्ष लागून आहे. शिवाय आपनं दिल्लीनंतर पंजाबमध्ये जोरदार मुसंडी मारल्यामुळं भाजपसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे.
ही बातमी देखील वाचा