एक्स्प्लोर

Delhi's Malviya Nagar Fire: मोठी बातमी : दिल्लीत हॉटेलमध्ये भीषण आग, आतापर्यंत 21 जणांचा होरपळून मृत्यू

Delhi Malviya Nagar Fire Updates: डीडीएमए (DDMA) दक्षिण जिल्ह्याचे उपविभागीय दंडाधिकारी (SDM) जितेंद्र कुमार यांनी सांगितले की, “सकाळी घटनेची माहिती मिळताच आम्ही तातडीने यंत्रणा सक्रिय केली

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील (Delhi) मालवीय नगरमध्ये आगीची (Fire) भीषण घटना घडली असून एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत होरपळून 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दिल्लीतील लेमन ग्रीन (Lomon green hotel) नावाच्या रेस्टॉरंटमध्ये बुधवार सकाळी 9.45 वाजता आग लागल्याची घटना घडली. याबाबत माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन सेवा (DFS) ने घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर येथील इमारतीमधून 37 नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. मात्र, या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सध्या जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

डीडीएमए (DDMA) दक्षिण जिल्ह्याचे उपविभागीय दंडाधिकारी (SDM) जितेंद्र कुमार यांनी सांगितले की, “सकाळी घटनेची माहिती मिळताच आम्ही तातडीने यंत्रणा सक्रिय केली आणि सर्व संबंधित पथकांना घटनास्थळी रवाना करण्यात आले. या इमारतीच्या तळमजल्यावर एक हॉटेल सुरू होते. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही; मात्र प्राथमिक माहितीनुसार त्या हॉटेलमधूनच आग लागल्याची शक्यता आहे.”

आगीपासून वाचण्यासाठी इमारतीवरुन उड्या

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीत आग वेगाने पसरल्यानंतर बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी इमारतीसमोरील जमिनीवर गाद्या टाकून बचावाची व्यवस्था केली. त्यानंतर अनेकांनी जीव वाचवण्यासाठी बाल्कनी, खिडक्या आणि इमारतीच्या वरच्या मजल्यांवरून खाली उड्या मारल्या.दरम्यान, निवासी भागांमध्ये किती हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना व्यवसायासाठी परवाना देण्यात आला आहे, याबाबतची माहिती महानगरपालिका प्रशासनाकडे मागवण्यात आली आहे. तसेच अशा सर्व आस्थापनांची नियमित तपासणी करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान मोदींकडून शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दिल्लीतील आगीच्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मालवीय नगर येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. तसेच, आगीच्या घटनेत जखमी झालेल्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत असल्याचं ट्विट मोदींनी केलं आहे. तर, दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 2 लाखांची आर्थिक मदत व जखमींना 50 हजार रुपये पंतप्रधान निधीतून देण्यात येतील, असेही त्यांनी जाहीर केले. 

हेही वाचा

तुकाराम मुंढेंच्या एफडीएच्या कारवाईचा धडाका कायम, बीडमध्ये लस्सीने भरलेल्या टाक्या अधिकाऱ्यांनी ओतल्या

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; ्
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
Embed widget