एक्स्प्लोर

हनीप्रीतला दिल्ली हायकोर्टाचा दणका, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर फरार झालेल्या हनीप्रीतचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे.

नवी दिल्ली : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीमची निकटवर्तीय हनीप्रीतला दिल्ली हायकोर्टाने दणका दिला आहे. राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर फरार झालेल्या हनीप्रीतचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. जीवाला धोका असल्यामुळे हनीप्रीत समोर येत नसल्याचं तिच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. त्यानंतर कोर्टाने हनीप्रीतला सुरक्षा पुरवण्याचं आश्वासन देण्याच्या अटीवर समोर येण्याचे आदेश दिले. हनीप्रीत येत्या दोन दिवसात समोर येण्याची शक्यता आहे. हनीप्रीतच्या जामिन अर्जात काय? ‘माझ्या जीवाला धोका आहे. मी बालपणापासूनच डेऱ्याशी जोडली गेले आहे. राम रहीमची मुलगी असणं माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. हरियाणा पोलिसांनी माझं नाव वॉण्टेड लिस्टमध्ये टाकलं आहे.’ असं हनीप्रीतने तिच्या अटकपूर्व जामीन अर्जात म्हटलं आहे. मीडियामध्ये माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत. त्यामुळे कोर्टाचे दरवाजे ठोठावण्यावाचून माझ्याजवळ कोणताही पर्याय नाही. माझ्याविरोधात कोणतीही केस नाही. जबरदस्ती मला गुन्ह्यात गोवलं जात आहे, असा दावाही तिने केला. ‘मी एकटी आहे आणि मला गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. मला तपासात सहभागी व्हायचं आहे. मी कोर्टाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाणार नाही. मला तीन आठवड्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी कोर्टाकडे विनंती करते.’ असं हनीप्रीतने अर्जात म्हटलं आहे. हनीप्रीत ही बेपत्ता झालीच नव्हती, सोमवारी ती स्वतः आपल्याला ऑफिसमध्ये भेटायला आल्याचा दावा हनीप्रीतच्या वकिलांनी केला. पोलिसांनी मात्र हनीप्रीत दिल्लीत असण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. हनीप्रीत ही आपली मानलेली मुलगी असल्याचं बाबा राम रहीम सर्वांना सांगायचा. मात्र हनीप्रीतचे बाबा राम रहीमशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप तिच्या घटस्फोटित नवऱ्याने केला होता. वकिलांच्या मार्फत हनीप्रीतने अनैतिक संबंधांचे आरोप फेटाळून लावले. ‘माझ्यावरील आरोप चुकीचे आहेत. बापलेकीच्या नात्याला चुकीच्या पद्धतीने जगासमोर आणण्यात आलं आहे’ असा दावा तिने केला. बाबा राम रहीमला शिक्षा झाल्यापासून आजपर्यंत हनीप्रीत फरार आहे. तिच्या चौकशीत बाबा राम रहीमचे अनेक काळे कारनामे पुढे येतील, असा पोलिसांचा कयास आहे. त्यामुळे हनीप्रीतविरोधात अटक वॉरट काढलं गेल्यानंतर तिचा शोध घेतला जात आहे. संबंधित बातम्या :

पोलिसांना गुंगारा देणारी हनीप्रीत नेपाळमध्ये दिसली : सूत्र

हनीप्रीतचा शोध सुरुच, बिहारमधील सात जिल्ह्यात अलर्ट जारी

हनीप्रीतच्या कुटुंबातील सदस्यही गायब

राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतविरोधात लूकआऊट नोटीस

हनीप्रीत नेपाळच्या बिराटनगरमध्ये लपलेली, सुत्रांची माहिती

हनीप्रीत आणि राम रहीमचे अनैतिक संबंध, हनीप्रीतच्या पतीचा आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget