एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
लष्कराच्या जवानाला मारहाण करणाऱ्या महिलेचा माफीनामा
दिल्लीतील निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर लष्कराच्या ट्रकमध्ये काही जवान बसले होते. त्यावेळी आरोपी स्मृती वेगाने आपल्या इंडिका कारमधून आल्या आणि लष्कराच्या वाहनाला ओव्हरटेक करत समोर त्यांनी आपली कार थांबवली
![लष्कराच्या जवानाला मारहाण करणाऱ्या महिलेचा माफीनामा Delhi Gurgaon Woman Who Slapped Soldier Repeatedly Apologizes Latest Update लष्कराच्या जवानाला मारहाण करणाऱ्या महिलेचा माफीनामा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/18090929/Delhi-Lady-Slapped-Jawan.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : दिल्लीत लष्कराच्या जवानाला मारहाण करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. मात्र गैरसमजुतीतून आपण जवानाला मारहाण केल्याचा दावा करत महिलेने माफी मागितली आहे.
भररस्त्यात जवानाला मारहाण करणाऱ्या कारचालक महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. लष्कराने यासंबंधी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. 44 वर्षीय स्मृती कालरा या महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
दिल्लीतील निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर लष्कराच्या ट्रकमध्ये काही जवान बसले होते. त्यावेळी आरोपी स्मृती वेगाने आपल्या इंडिका कारमधून आल्या आणि लष्कराच्या वाहनाला ओव्हरटेक करत समोर त्यांनी आपली कार थांबवली. एकाएकी स्मृती यांनी थेट एका जवानावरच हात उचलला.
संबंधित जवान स्मृती यांना समजावण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्यांनी जवानाला मारण्यास सुरुवात केली. हा प्रकार शेजारुन जाणाऱ्या कारमधील व्यक्तीच्या मोबाईलमध्ये कैद झाला आहे.
सहकाऱ्याला होणारी मारहाण पाहून ट्रकमधील इतर जवान खाली उतरले. त्यांनी स्मृती यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या कारमध्ये बसून निघून गेल्या. या प्रकारानंतर रस्त्यात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
आपली छेडछाड होत असल्याच्या गैरसमजुतीतून मारहाण केल्याचा दावा महिलेने केला आहे. माफीनाम्याच्या मुलाखतीचा व्हिडिओही सोशल साईट्सवर व्हायरल झाला आहे.
मारहाणीचा व्हिडिओ :
माफीनाम्याचा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
विश्व
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)