एक्स्प्लोर
Advertisement
दिल्लीत छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या, शेजाऱ्यावर आरोप
नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील वसंत कुंजच्या किशनगढ परिसरात मंगळवार संध्याकाळी एका 19 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. तरुणीच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, शेजारी नीरज याच्याकडून गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या छेडछाडीला कंटाळून तरुणीने आत्महत्येचं पाऊल उचललं. नीरज तरुणीला फोनवरुन त्रास देत असे, असाही आरोप नातेवाईकांनी केला आहे.
मृत तरुणी ब्युटिशियन होती आणि तिच्या ब्युटी पार्लरच्या साईन बोर्डवर संपर्क क्रमांक होता. नीरजने त्या साईन बोर्डवरुन मोबाईल नंबर घेतला आणि फोन करुन त्रास देऊ लागला.
तरुणी मंगळवारी संध्याकाळी क्लाईंटकडून जेव्हा घरी येत होती, तेव्हा नीरजने काही मित्रांच्या सोबतीने तरुणीची भर रस्त्यात छेडछाड केली.
तरुणीने नीरज आणि त्याच्या मित्रांना विरोध केल्यानंतर, तरुणीला मारहाण केली गेली. तरुणीने घडला प्रकार फोन करुन आपली बहीण आणि आईला सांगितला. त्यानंतर घरी पोहोचल्यानंतर तिने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. मृत तरुणीच्या आईने पोलिसांना याबाबत सर्व माहिती पोलिसांना दिली असून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याअंतर्गत आरोपी नीरजला अटक करण्यात आली आहे.
नीरजसोबत असलेल्या तरुणांनाही अटक करण्याची मागणी मृत तरुणीच्या नातेवाईकांनी केली आहे. कारण छेडछाड करण्यास या तरुणांनीही नीरजला मदत केली होती, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement