दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल
कोरोनाची लागण झाल्यानंतर मनिष सिसोदिया आपल्या घरी होम क्वारंटाइन होते. परंतु त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले.
दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना लोक नायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 14 सप्टेंबर रोजी करोनाची लागण झाली होती.
कोरोनाची लागण झाल्यानंतर मनिष सिसोदिया आपल्या घरी होम क्वारंटाइन होते. परंतु त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांची ऑक्सिजनची पातळी देखील कमी होती. यापूर्वी दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात भरती केले होते. सत्येंद्र जैन यांनी कोरोनावर मात केली आहे.
मनिष सिसोदिया यांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालय मेडिकल बुलेटीनच्या माध्यमातून सिसोदिया यांच्या प्रकृतीची माहिती देणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राजधानीमध्ये दिवसाला 4 हजारपेक्षा अधिक रुग्ण दिवसाला सापडत आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्याबद्दल दिल्ली सरकारने प्रश्न उपस्थित केला होता.
14 सप्टेंबरला मनिष सिसोदिया यांनी ट्विट करत आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. तसंच आपल्या संपर्कात आलेल्यांना करोना चाचणी करण्याचं आवाहन केलं होतं.