Delhi Crime : तिहेरी हत्याकांडांने शहर हादरलं; पत्नीसह दोन चिमुरड्या मुलींना संपवलं, शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली महत्त्वाची माहिती
Delhi Crime : दिल्लीत रक्षाबंधनाच्या दिवशी तिहेरी हत्याकांडाचा एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. मृतांमध्ये एक महिला आणि तिच्या दोन मुलींचा समावेश आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहेत आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत आणि तपास सुरू केला आहे.

दिल्ली: दिल्लीत रक्षाबंधन सणादिवशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ईशान्य दिल्लीतील करावल नगर भागात रक्षाबंधनाच्या दिवशी तिहेरी हत्याकांडाचा एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. मृतांमध्ये एक महिला आणि तिच्या दोन मुलींचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले आणि तपास (Delhi Crime News) सुरू केला. आरोपी पतीने कुटुंबाची हत्या कशी केली हे अद्याप कळलेले नाही. (Delhi Crime News)
महिलेसह 7 आणि 5 वर्षांच्या दोन मुली मृतावस्थेत आढळल्या
दिल्ली पोलिसांकडून याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच शनिवारी, ता 9 रोजी सकाळी 7:15 वाजता, करावल नगर पोलिस ठाण्यात एका महिलेच्या आणि तिच्या दोन मुलींच्या मृत्यूची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस पथकाला (Delhi Crime News) त्यांच्या खोलीत सुमारे 28 वर्षांची एक महिला आणि तिच्या 7 आणि 5 वर्षांच्या दोन मुली मृतावस्थेत आढळल्या. सुरुवातीच्या तपासात पोलिसांना असे आढळून आले की पती-पत्नीमध्ये वाद होता आणि हा वाद या घटनेचे कारण असू शकतो. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे आणि पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, पत्नी जयश्री हिच्याशी दीर्घकाळापासून सुरू असलेले वाद हे या हत्येमागील कारण असू शकते. मात्र, नेमके कारण काय आहे याचा तपास केला जात आहे, असे त्यांनी सांगितले.(Delhi Crime News)
आरोपी पतीला पकडण्यासाठी पोलिसांनी पथके
पोलिस गुन्हे आणि फॉरेन्सिक (FSL) पथके घटनास्थळी पोहोचून पुरावे गोळा करत आहेत. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी GTB रुग्णालयात पाठवले जात आहेत. करावल नगर पोलिस ठाण्यात कलम 103(1) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू करण्यात आला आहे. आरोपी पतीला पकडण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत.
पती-पत्नीमध्ये नेहमीच भांडणे व्हायची
आरोपी प्रदीपने त्याची पत्नी जयश्री आणि पाच आणि सात वर्षांच्या दोन मुलींची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की तो त्याच्या पत्नीशी अनेकदा भांडत असे. हत्येपासून आरोपी फरार आहे. "आम्हाला आज सकाळी सहा वाजता घटनेची माहिती मिळाली. आम्ही दार उघडले तेव्हा आम्हाला आई आणि दोन मुली त्यांच्या बेडवर दिसल्या. पती-पत्नीमध्ये नेहमीच भांडणे व्हायची," असे एका शेजाऱ्याने सांगितले.























