एक्स्प्लोर
Advertisement
फटाकेबंदीचा निषेध, सुप्रीम कोर्टासमोर रॉकेट सोडलं!
विहिंप आणि रा. स्व. संघाला समर्थन देणाऱ्या आझाद हिंद फौज आणि हिंदू हेल्पलाईनच्या कार्यकर्त्यांनी हा प्रताप केल्याचा आरोप आहे
नवी दिल्ली : दिल्लीत फटाक्यांच्या विक्रीवर असलेल्या बंदीचा निषेध करत सुप्रीम कोर्टासमोर चक्क रॉकेट सोडण्यात आलं. या प्रकरणी 18 जणांना अटक करण्यात आली आहे.
विहिंप आणि रा. स्व. संघाला समर्थन देणाऱ्या आझाद हिंद फौज आणि हिंदू हेल्पलाईनच्या कार्यकर्त्यांनी हा प्रताप केल्याचा आरोप आहे. सुप्रीम कोर्टासमोर फटाके फोडून आणि नागरिकांना फटाके वाटून विरोध व्यक्त करण्यात आला.
प्रदूषण करणाऱ्या इतर वस्तूंवर बंदी घातली जात नाही, मग फटाक्यांवरच का? असा सवाल करत हिंदू संघटनांनी सुप्रीम कोर्टाने बुधवारपर्यंत हिंदूविरोधी निर्णय हटवला नाही, तर दिवाळीत सुप्रीम कोर्टाच्या दालनात फटाके फोडणार, असा इशाराही दिला.
हिंदू सणांवर लादण्यात आलेली बंदी ही अन्यायकारक असून, फटाक्यांवर रोजगार चालणाऱ्यांची उपासमार होत असल्यानं हा निषेध व्यक्त केल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली. या आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवलं आणि 18 जणांना अटक केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement