एक्स्प्लोर

Delhi Corona : राजधानी दिल्लीत कोरोना वाढतोय! सरकार सतर्क, मास्क न घालणाऱ्यांना दंड; आदेश जारी

Delhi Corona Mask Fine: कोरोनाच्या वाढत्या केसेस पाहता दिल्ली सरकारनं सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणारांना 500 रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश दिले आहेत.  

Delhi public places Corona Mask Fine: देशात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या वाढत्या केसेस पाहता दिल्ली सरकारनं सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणारांना 500 रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश दिले आहेत.  जर आपण राजधानी दिल्लीमध्ये (National Capitol)आपल्या गाडीतून एकटे प्रवास करत असाल तर आपल्याला मास्क (Wearing Mask) घालणं आवश्यक नाही. मात्र दिल्ली (Delhi)मध्ये आता सार्वजनिक ठिकाणांवर मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. विना मास्क आढळणाऱ्यांकडून 500 रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.  

कोरोनाचे वाढते रुग्ण पाहून दिल्ली सरकारनं याबाबत आदेश जारी केले आहेत. मात्र खाजगी गाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांना मात्र हे बंधनकारक नसेल.  

दिल्लीमध्ये वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण

दिल्लीमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. यामुळं दिल्ली सरकारनं  15 ते 59 वयोगटातील लोकांना बूस्टर डोस फ्री मध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. बूस्टर डोस देण्याची प्रक्रिया सुरु देखील झाली आहे.  

दिल्लीमध्ये पहिल्यांदा विना मास्क फिरणाऱ्यांना 2000 रुपयांचा दंड केला जायचा. मात्र तो कमी करत नंतर 500 रुपये करण्यात आला आहे. मात्र कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर दंड बंद केला होता. मात्र आता पुन्हा दिल्ली सरकारनं पुन्हा मास्क न लावणाऱ्यांकडून 500 रुपयांचा दंड घेण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये गुरुवारी कोरोनाचे 965 रुग्ण सापडलेत तर बुधवारी एक हजारहून जास्त कोरोना रुग्ण समोर आले होते.  

कोरोनाचा विळखा वाढू लागल्यानंतर काही राज्यात मास्क वापरणे पुन्हा सक्तीचे करण्यात आले आहे. दिल्ली नोएडा, गाझियाबाद, पंजाब आणि हरियाणामध्ये मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. मास्क न वापरणाऱ्यांना आर्थिक दंड ठोठावण्यात येणार असल्याचे स्थानिक प्रशासनाने जाहीर केले आहे. काही ठिकाणी पुन्हा एकदा शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यातआला. त्यामुळे पुन्हा एकदा ऑनलाईन वर्ग भरले आहेत. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं दिसत आहे. राज्यात सध्या मास्क सक्तीचा नाही.  



अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uttarakhand UCC : लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
Delhi Election : इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
Nanded News : माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप, गुन्हा दाखल 
माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप
पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई
पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा 2024 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ| Akshay Kothari, Isha KesakarABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स :  3 PM : 27 Jan 2025 : ABP MajhaMahaKumbh Mela | Amit Shah  यांचं  प्रयागराज मध्ये महाकुंभमेळ्यात पवित्र स्नानAmey Khopakar :Chhaava चित्रपटावर MNS ची भूमिका काय? Laxman Utekar Raj Thackeray भेटीची A - Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uttarakhand UCC : लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
Delhi Election : इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
Nanded News : माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप, गुन्हा दाखल 
माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप
पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई
पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई
महायुती सरकार राज्यातील वाघांची नसबंदी करणार? मोदी सरकारकडे पाठवणार प्रस्ताव, वनमंत्री नाईकांची माहिती  
महायुती सरकार राज्यातील वाघांची नसबंदी करणार? मोदी सरकारकडे पाठवणार प्रस्ताव, वनमंत्री नाईकांची माहिती  
बांगलादेशींना बनावट जन्मदाखले दिल्याचा ठपका, नितीनकुमार देवरे निलंबित, आता तहसीलदार संघटनेची शासनाकडे मोठी मागणी
बांगलादेशींना बनावट जन्मदाखले दिल्याचा ठपका, नितीनकुमार देवरे निलंबित, आता तहसीलदार संघटनेची शासनाकडे मोठी मागणी
Hasan Mushrif : म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
सुषमा अंधारे येताच माजी आमदाराने बैठक सोडली, खोचक प्रतिक्रिया; पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी?
सुषमा अंधारे येताच माजी आमदाराने बैठक सोडली, खोचक प्रतिक्रिया; पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी?
Embed widget