एक्स्प्लोर
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांची व्हॅगन-आर कार चोरीला
दिल्ली पोलिस केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्यामुळे केंद्राचं 'ध्यान कुठे आहे?' हे ट्वीट केजरीवालांनी रीट्वीट केलं आहे.
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कार चोरीला गेली आहे. केजरीवालांच्या साध्या राहणीची ओळख असलेली निळ्या रंगाची व्हॅगन-आर कार सचिवालयासमोरुन चोरीला गेली.
दिल्ली पोलिस केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्यामुळे केंद्राचं 'ध्यान कुठे आहे?' हे ट्वीट केजरीवालांनी रीट्वीट केलं आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना ही कार चोरीला गेल्याने हा दिल्ली पोलिसांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न झाला आहे.
https://twitter.com/jalajboy/status/918457697212567552
परदेशी राहणाऱ्या भारतीयाकडून ही कार केजरीवालांना भेट मिळाली होती. व्हीआयपी कल्चरचा विरोध म्हणून 'आम आदमी पक्षा'ने या निळ्या व्हॅगन आरचा प्रतिकात्मक वापर केला होता.
2014 मध्ये दिल्ली पोलिसांविरोधात केलेल्या आंदोलनात केजरीवालांनी या गाडीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला होता. दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी केजरीवालांनी हीच कार वापरली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement