एक्स्प्लोर

Arvind kejriwal : एकापाठोपाठ एक सरकार पाडणारा सीरियल किलर आलाय; केजरीवालांचा भाजपवर निशाणा

Arvind kejriwal :

Arvind kejriwal : "शहरात एक सीरियल किलर आला आहे. हा सीरियल किलर प्रत्येक राज्यातील सरकार पाडण्यात मग्न आहे. हा किलर एकामागून एक हत्या करत आहे. या लोकांनी आजपर्यंत 277 आमदारांना विकत घेतले आहे. त्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यांनी आत्तापर्यंत गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, आसाम, मध्य प्रदेश, बिहार, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि मेघालय अशी अनेक सरकारे पाडली आहेत. शहरात एकापाठोपाठ एक खून करणारा सीरियल किलर आहे. लोक सरकार निवडतात आणि हे पाडतात, असा निशाणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर साधला आहे. 

आम आदमी पार्टी (आप) सरकारने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी सभागृहात भाषण केले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. "या लोकांनी मिळून दिल्लीचे सरकार पाडण्याचा कट रचला आहे. त्यासाठी सर्व देशविरोधी शक्ती एकत्र आल्या आहेत. त्यामुळे मनीष सिसोदिया यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले. मनीष सिसोदिया यांच्या घरी 14 तास रेड सुरू होती. गादी आणि उशा फाडून ते संध्याकाळी बाहेर आले. परंतु, त्यांच्या हाती दमडीही लागली नही. 7 ते 8 दिवस छापे टाकले. परंतु, हाती काहीच लागले नाही,  असे केजरीवाल म्हणाले. 

"तुम्ही भाजपच्या आठ आमदारांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसवून कोणता घोटाळा झाला आहे असे विचरले तर त्यातील पाच जणांना काहीही माहित नाही म्हणून सांगतील. तर इतर तीघे जण वेगवेगळे घोटाळे सांगतील. कारण खोटे वेगळे आणि सत्य एकच असते. सत्य हे आहे की कोणताही घोटाळा झाला नाही, असा विश्वास केजरीवाल यांनी  व्यक्त केला. 

केजरीवाल म्हणाले, "देशात एकच शिक्षणमंत्री आहे. अमेरिकेतील लोकांना विचारले तरी मनीष सिसोदिया हेच शिक्षणमंत्री आहेत असे सांगितले जाते. आप सरकार सोमवारी विश्वासदर्शक ठराव आणणार आहे आणि हे जनतेचेच सरकार असल्याचे दाखवून देईल. 

"छापा पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी मनीष सिसोदिया यांचा फोन आला, भाजपकडून मुख्यमंत्री होण्याची ऑफर आली. मी मागील जन्मात काही कर्म केले असेल, म्हणून त्यांच्यासारखा उपमुख्यमंत्री आम्हाला मिळाला. दिल्लीत सध्या ऑपरेशन लोटस सुरू आहे. दिल्लीत घोडे बाजारासाठी 800 कोटी रुपये ठेवले आहेत. गुजरात आणि इतर राज्यांत त्यांचा गड कोसळत आहे. आम्ही गुजरात निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले तर सर्व तपास बंद होतील, अशा निशाना केजरीवाल यांनी भाजपवर लगावला आहे. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
PM Modi In Nigeria : पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  1 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNavneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर आम्हाही तीच भाषा करू - नवनीत राणाDevendra Fadnavis : स्ट्राईक रेट आणि जागांवर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होणार नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
PM Modi In Nigeria : पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Embed widget