Delhi Bomb Blast News: 3 तास कार पार्किंगमध्ये उभी केली, 6.22 वाजता निघाली, एक यू-टर्न, सिग्नलला वेग कमी अन्...; नेमकं काय काय घडलं?
Delhi Bomb Blast News: दिल्ली पोलीस स्फोट झालेल्या कारच्या मार्गाची माहिती घेत असून पुढील कारवाई करत आहे. ही गाडी फरीदाबादहून आली आहे, या अनुषंगाने ही सगळा तपास सुरु आहे.

Delhi Bomb Blast News नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्ली काल (10 नोव्हेंबर) स्फोटाने (Delhi Bomb Blast) हादरली. ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील लाल किल्ला (Delhi Red Fort Blast) मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळून जाणाऱ्या एका कारमध्ये (Delhi Car Blast) सोमवारी सायंकाळी 6.52 वाजता भयंकर स्फोट झाला. या स्फोटात 9 जण ठार व 24 जण जखमी झाले. स्फोटानंतर आग भडकली व परिसरातील अनेक वाहनांनी पेट घेतला. मेट्रो स्टेशनच्या गेट आणि आजूबाजूच्या काचाही फुटल्या. कारचा स्फोट होण्याआधी सदर i-20 कार सुनहेरी मशीदजवळील पार्किंगमध्ये जवळपास 3 तास उभी होती.
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनूसार, सोमवारी संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास सदर i-20 कार दर्यागंज मार्केट परिसरातून निघताना दिसली. त्यानंतर ती सुनहेरी मशिदीजवळील पार्किंगमध्ये पोहोचली. त्यानंतर सायंकाळी 6.22 वाजताच्या सुमारास पार्किंगमधून कार छट्टा रेल चौकात यू-टर्न घेत लोअर सुभाष मार्गाकडे जातानाही कॅमेऱ्यांनी कैद केली. छट्टा रेल चौकात यू-टर्न घेतल्यानंतर, कार लोअर सुभाष मार्गाकडे जात होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले आहे की, सायंकाळी 6.52 वाजता स्फोट झाला त्याआधी सिग्नलजवळ कारचा (Delhi Car Blast) वेग कमी झाला होता. दरम्यान, आता दिल्ली पोलीस कारच्या मार्गाची माहिती घेत असून पुढील कारवाई करत आहे. ही गाडी फरीदाबादहून आली आहे, या अनुषंगाने ही सगळा तपास सुरु आहे. या गाडीचा सगळा तपास आता दिल्ली पोलिसांकडून सुरु असून आसपासचे सगळे सीसीटीव्ही ही चेक केले जाणार आहे.
#WATCH | Delhi | Relatives of those who were killed in the blast near the Red Fort yesterday mourn the demise of their loved ones. Eight people died in the blast.
— ANI (@ANI) November 11, 2025
Visuals from outside the Lok Nayak Jai Prakash Narayan (LNJP) mortuary. pic.twitter.com/ipJFClHwJa
स्फोट झालेल्या i-20 कारबाबत कोणती माहिती समोर आली? (Delhi Car Blast)
1. ह्युंदाई कंपनीची i-20 कार स्फोटांसाठी वापरली.
2. दिल्लीतला मोहम्मद सलमान कारचा मूळ मालक.
3. सलमाननं आपली कार ओखला भागातील नदीमला विकली.
4. नदीमने i-20 कार 'रॉयल कार झोन' या डीलरला विकली.
5. पुलवामाच्या तारीकने 'रॉयल कार झोन'कडून i-20 कार घेतली.
6. तारीक मूळचा पुलवामाचा, पण फरीदाबादमध्ये राहत होता.
7. फरीदाबादमध्ये 2900 किलो स्फोटके सापडलेला डॉ.मुझम्मील शकीलही पुलवामाचाच.
8. मुझम्मील शकीलच्या अटकेनंतर तारीकने घाबरुन आत्मघाती हल्ला केल्याचा संशय.
दिल्ली स्फोट प्रकरणात दोन संशयितांची नावे समोर- (Delhi Red Fort Blast)
दिल्ली स्फोट प्रकरणात दोन संशयितांची नावे समोर आली आहे. मोहम्मद उमर आणि तारिक अशी संशयितांची नावे असल्याची माहिती मिळत आहे. स्फोटांसाठी वापरलेली i-20 कार तारिकच्या नावावर होती. मोहम्मद उमरने कार चालवत नेऊन आत्मघाती हल्ला केल्याचा संशय समोर येत आहे. स्फोटात मोहम्मद उमरही ठार झाल्याचा अंदाज आहे. दिल्ली पोलिसांकडून युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला आहे. तसेच विविध ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे.
























