Delhi Blast Update : स्फोट झालेल्या गाडीत पोलिसांना सापडला पाय; पण कोणाचा? DNA रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
Delhi Blast updates in Marathi: शक्तिशाली बॉम्बस्फोटाने गाडीत फक्त पायच शिल्लक राहिला, सगळ्या शरीराच्या चिंधड्या झाल्या. डीएनए रिपोर्टमध्ये महत्त्वाची माहिती समोर

Delhi Bomb Blast: दिल्लीत सोमवारी संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात झालेल्या भीषण स्फोटामुळे संपूर्ण देश हादरुन गेला होता. या स्फोटात नऊ नागरिकांचा मृत्यू झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, काही मृतांच्या शरीराचे अक्षरश: तुकडे झाले होते. हे तुकडे काही अंतरापर्यंत फेकले गेले होते. फॉरेन्सिक पथकांनी हे सगळे अवयव गोळा करुन मृतांची ओळख पटवली. ज्या कारमध्ये स्फोटकं होती, त्या कारची पोलिसांनी तपासणी केली. तेव्हा पोलिसांना या कारमध्ये ड्रायव्हिंग व्हिल अन् अॅक्सलेटर याच्यामध्ये फक्त एक पाय सापडला होता. या व्यक्तीचे उर्वरित शरीराच्या स्फोटामुळे (Red Fort blast) चिंधड्या झाल्या होत्या. हा पाय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आला होता. याठिकाणी डीएनए चाचणी (DNA Test) केल्यानंतर हा पायाचा भाग डॉ. उमर उन नबी (Dr Umar Un Nabi.) याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Delhi News)
Delhi terror blast case | A DNA test has confirmed that the man who carried out the blast near Red Fort was Dr Umar Un Nabi. After the blast, his leg was stuck between the steering wheel and accelerator. His DNA sample matched with his mother: Delhi Police pic.twitter.com/yh37EVQ1n4
— ANI (@ANI) November 13, 2025
ज्या कारमध्ये स्फोटकं ठेवण्यात आली होती, ती कार डॉ. उमर उन नबी चालवत होता. फरिदाबाद येथील साथीदार आणि स्फोटकांचा साठा पकडला गेल्यानंतर त्याने घाईगडबडीत हा स्फोट घडवून आणला असावा, असा अंदाज आहे. त्याला मध्य दिल्लीच्या परिसरात स्फोट करायचा होता. त्यासाठी त्याने लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या परिसरातून गाडी काढली होती आणि तो मध्य दिल्लीकडे निघाला होता. मात्र, जवळच्याच सिग्नलवर स्फोटके ट्रिगर झाल्याने तिकडेच स्फोट झाला असावा, अशी शक्यता बोलून दाखवली जात आहे. डॉ. उमर उन नबी त्याची आय 20 कार कोणत्या मार्गाने दिल्लीत घेऊन आला, याचा पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहाय्याने माग काढला. स्फोटाच्या दिवशी ही आय 20 कार 3 वाजून 18 मिनिटांनी लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये दाखल झाली. त्यानंतर 6 वाजून 23 मिनिटांनी ही कार पार्किंगमधून निघाली आणि 6 वाजून 52 मिनिटांनी स्फोट झाला होता. उमर उन नवी हा काश्मीरमधील पुलवामा येथे राहणार होता. त्याच्या कुटुंबीयांनी या स्फोटाबाबत आपल्याला माहिती नसल्याचा दावा केला. आमची कार आमच्या घराबाहेरच उभी आहे. आमची कार हरियाणा पासिंगची नव्हती. स्फोटासाठी वापरण्यात आलेली कार आमची नाही, असे उमरच्या कुटुंबीयांनी म्हटले होते.
आणखी वाचा
दिल्ली बॉम्बस्फोटाचा भयानक व्हिडीओ अखेर समोर आला, त्या क्षणी नेमकं काय घडलं?























