एक्स्प्लोर

Delhi Blast : स्फोट होण्याआधीचा पहिला सीसीटीव्ही फुटेज आला समोर; डॉक्टर उमर कारमध्ये काळा मास्क घालून बसलेला, गाडी कोणाची?, मोठी माहिती समोर

Delhi Blast : सोमवारी संध्याकाळी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. स्फोटापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये एक पांढऱ्या रंगाची आय-२० कार गर्दीतून जात असल्याचे दिसून आले आहे.

Delhi Blast नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीमध्ये काल (सोमवारी 10 नोव्हेंबर) मोठा स्फोट झाला(Delhi Bomb Blast). ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील लाल किल्ला (Delhi Red Fort Blast) मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळून जाणाऱ्या एका कारमध्ये (Delhi Car Blast) सोमवारी सायंकाळी 6.52 वाजता मोठा स्फोट झाला. या स्फोटात 9 जण ठार व 24 जण जखमी झाले. स्फोटानंतर आग भडकली मोठ्या ज्वाळा भडकल्या, यामुळे परिसरातील अनेक वाहनांनी पेट घेतला. मेट्रो स्टेशनच्या गेट आणि आजूबाजूच्या काचाही फुटल्या. या स्फोटापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

Delhi Blast : फुटेज स्फोटाच्या तपासात एक महत्त्वाचा दुवा ठरू शकते

फुटेजमध्ये, एक आय-२० कार गर्दीच्या वाहतुकीतून जात असल्याचे दिसून येत आहे. काळा मास्क घातलेला तो माणूस, सुरुवातीला ड्रायव्हरच्या सीटवर बसलेला दिसला, तो दहशतवादी मोहम्मद उमर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हे फुटेज स्फोटाच्या तपासात एक महत्त्वाचा दुवा ठरू शकते. ज्यामध्ये हे एक संशयास्पद वाहन दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये रस्ता खूप वर्दळीचा असताना एक पांढऱ्या रंगाची आय-२० कार त्या भागातून जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. गाडी वाहतुकीतून पुढे जात राहिली.
फुटेजनुसार, कार चालवणाऱ्या माणसाने आपला चेहरा काळ्या मास्कने झाकलेला होता. तपास यंत्रणा आता कार आणि मास्क घातलेल्या चालकाची ओळख पटविण्यासाठी तांत्रिक आणि इतर गोष्टींचा वापर करत आहेत.

Delhi Blast : ती गाडी कोणाची होती?

स्फोट झालेली हुंडई आय२० गाडी मूळ मोहम्मद सलमानची होती, पण त्याने ती नदीमला विकली होती. नंतर त्याने ती फरीदाबादमधील एका जुन्या कारच्या विक्रेत्याला रॉयल कार झोनला विकली होती. नंतर, तारिकने ती विकत घेतली आणि नंतर उमरने ती घेतली होती. मेट्रो स्टेशन गेट क्रमांक १ वर स्फोट झाला.

दिल्लीच्या लाल किल्ल्याबाहेर झालेल्या कार बॉम्बस्फोटाची चौकशी आता संशयित दहशतवादी हल्ला म्हणून केली जात आहे.
लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ हुंडई आय२० कार स्फोटकांनी भरलेली होती आणि ती जाणूनबुजून उडवून देण्यात आली होती, याची पुष्टी तपासकर्त्यांनी केली आहे. 

अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा हल्ला आत्मघातकी पद्धतीचा असल्याचे दिसून येत आहे. सूत्रांनी सांगितले की ही कार जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी तारिकने खरेदी केली होती. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. फरीदाबादमधील एका दहशतवादी मॉड्यूलशी त्याचे संबंध तपासत आहेत ज्याने बॉम्बस्फोटाचा कट रचला असल्याचे मानले जाते.

सुरुवातीच्या गुप्तचर अहवालांनुसार, गाडीमध्ये स्फोटके भरलेली होती आणि नंतर ती गर्दीच्या ठिकाणी नेण्यात आली. संध्याकाळी ६:५२ वाजता, गाडीचा स्फोट झाला आणि आग लागली आणि जवळपासच्या वाहनांनीही पेट घेतला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की स्फोट इतका भयीनक होता की त्यामुळे रस्त्यावरील दिवे विझले आणि अनेक फूट उंच ज्वाला पसरल्या. स्फोटाचे कारण तपासले जात आहे.

मोहम्मद उमरने आत्मघाती हल्ला केल्याच्या संशय- (Delhi Bomb Blast)

दिल्ली स्फोट प्रकरणात दोन संशयितांची नावे समोर आली आहे. मोहम्मद उमर आणि तारिक अशी संशयितांची नावे असल्याची माहिती मिळत आहे. स्फोटांसाठी वापरलेली i-20 कार तारिकच्या नावावर होती. मोहम्मद उमरने कार चालवत नेऊन आत्मघाती हल्ला केल्याचा संशय समोर येत आहे. स्फोटात मोहम्मद उमरही ठार झाल्याचा अंदाज आहे. दिल्ली पोलिसांकडून युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला आहे. तसेच विविध ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे. 

स्फोटांसाठी वापरली i-20 कार- (Delhi Car Blast)

1. ह्युंदाई कंपनीची i-20 कार स्फोटांसाठी वापरली.

2. दिल्लीतला मोहम्मद सलमान कारचा मूळ मालक.

3. सलमाननं आपली कार ओखला भागातील नदीमला विकली.

4. नदीमने i-20 कार 'रॉयल कार झोन' या डीलरला विकली.

5. पुलवामाच्या तारीकने 'रॉयल कार झोन'कडून i-20 कार घेतली.

6. तारीक मूळचा पुलवामाचा, पण फरीदाबादमध्ये राहत होता.

7. फरीदाबादमध्ये 2900 किलो स्फोटके सापडलेला डॉ.मुझम्मील शकीलही पुलवामाचाच.

8. मुझम्मील शकीलच्या अटकेनंतर तारीकने घाबरुन आत्मघाती हल्ला केल्याचा संशय.

नेमकं काय घडलं? (Delhi Red Fort Blast) 

1. दिल्लीमध्ये लाल किल्ला मेट्रो स्टेशननजीकच्या सिग्नलजवळ कारमध्ये स्फोट
2. सोमवार 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.52 दरम्यान घटना घडली
3. स्फोट इतका भीषण की, साधारण 8 ते 10 कार आणि इतर वाहने जळून खाक
4. सायंकाळी 6.55 वाजता अग्निशमन दलाला स्फोटाची माहिती मिळाली
5. दिल्ली पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल, नपासाला सुरुवात 
6. लाल किल्ल्याभोवतीचा संपूर्ण परिसर, चांदणी चौक आणि रस्ते बंद
7. कारचा स्फोट कशामुळे झाला याबाबतचे अधिकृत कारण अद्याप अस्पष्ट
8. घटनेनंतर एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती
9. रात्री 10 पर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, देशभरात हायअलर्ट जारी

महत्त्वाच्या बातम्या

Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Embed widget