एक्स्प्लोर
पतीची वेगाची नशा गायिकेच्या जीवावर, अपघातात मृत्यू
एका कारला ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटल्याने शिवानी भाटियाची गाडी दुभाजकावर आदळली. जिथे शिवानी बसली होती, त्या बाजूचा पूर्णपणे चक्काचूर झाला होता.
नवी दिल्ली : नवोदित गायिका शिवानी भाटियाला भीषण रस्ते अपघातात प्राण गमवावे लागले. दिल्लीतील यमुना एक्स्प्रेस वेवर झालेल्या अपघातात शिवानी आणि पती निखिल गंभीर जखमी झाले, मात्र रुग्णालयात शिवानीचा मृत्यू झाला, तर जखमी निखिलवर उपचार सुरु आहेत.
एका इव्हेंटमध्ये परफॉर्म करण्यासाठी 24 वर्षीय शिवानी निघाली होती. यावेळी निखिल भरधाव वेगाने गाडी चालवत होता. एका कारला ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटल्याने त्यांची गाडी दुभाजकावर आदळली. जिथे शिवानी बसली होती, त्या बाजूचा पूर्णपणे चक्काचूर झाला होता.
जखमी झालेल्या शिवानी-निखिल यांना मथुरेतील नियती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र शिवानीने मंगळवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. शिवानी 2016 साली एका भोजपुरी रिअॅलिटी शोमध्ये उपविजेती ठरली होती. त्यानंतर अल्पावधीतच तिने नाव कमावलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement