एक्स्प्लोर

Delhi Pollution : सर्वोच्च न्यायालयाचा फटाकेबंदीचा आदेश धाब्यावर! दिल्लीत जोरदार आतषबाजी, AQI घातक 969 पातळीवर

Diwali Firecrackers in Delhi : संपूर्ण देशात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. राजधानी दिल्लीत नागरिकांनी बंदी असतानाही फटाके फोडले. ज्यामुळे प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे.

Firecrackers Ban In Delhi : दिल्ली (Delhi) आणि एनसीआरमध्ये दिवाळीत फटाक्यांवर बंदी (Firecrackers Ban) असतानाही मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी (Firecrackers)  करत नियम धाब्यावर बसवण्यात आले. दिवाळी (Diwali 2023) हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. दिवाळीत घरोघरी रांगोळी काढली जाते आणि आनंद साजरा करण्यासाठी फटाक्यांची आतषबाजीही (Diwali Firecrackers) केली  जाते. मात्र, दिल्लीत वाढत्या प्रदूषणामुळे सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिवाळीत फटाके फोडण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. एखाद्या व्यक्तीने फटाके फोडल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. असं असलं तरी, दिल्लीतील नागरिकांनी मात्र सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवला. दिल्लीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले गेले.

दिवाळीच्या आधीच दिल्लीमध्ये प्रदूषणात प्रचंड वाढ झाली होती. दिल्ली एनसीआरमधील प्रदूषणामुळे सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घातली होती, मात्र त्यानंतरही दिवाळीत अनेक भागात फटाके फोडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास फटाक्यांची आतषबाजी वाढली. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत ते कमीच राहिले.

दिल्लीकरांकडून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर

रविवारी, 12 नोव्हेंबरला ल्क्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळपासूनच अनेक भागात फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली, त्याचं प्रमाणे संध्याकाळपर्यंत वाढत गेले. इतकंच नाही तर, अगदी मध्यरात्रीपर्यंत फटाके फोडण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली. काही सेकंदांच्या अंतराने 90 डेसिबलची आवाज मर्यादा ओलांडणाऱ्या फटाक्यांचा आवाज रात्री 10 वाजेपर्यंत दिल्लीत जवळपास प्रत्येक भागासह ऐकू येत होता.

दिल्लीत कुठे आणि किती प्रदूषण?

फटाक्यांच्या आतषबाजीमुळे दिल्लीतील प्रदूषणातही अनेक पटींनी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील हवेची पातळी घसरली होती, आता फटाक्यांमुळे हवेची गुणवत्ता आणखी घसरली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, सोमवारी सकाळी दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI-Air Quality Index) 296 होता, ही आकडेवारी सामान्यपेक्षा सहापट जास्त आहे. CPCB - PM 2.5 नुसार, लोनी गाझियाबादमध्ये सकाळी 6 वाजता AQI (Air Quality Index) 414 होता, तर नोएडा सेक्टर 62 मध्ये AQI 488, पंजाबी बाग - 500 आणि रोहिणीमध्ये AQI 456 होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
BJP Maha Adhiveshan : ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
Manikrao Kokate : 'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेशCM Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीसांचा भाजप जिल्हाध्यक्ष, प्रदेश, पदाधिकारी, मंत्र्यांना कानमंत्रCM Devendra Fadnavis : युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा : देवेंद्र फडणवीसTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
BJP Maha Adhiveshan : ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
Manikrao Kokate : 'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
IPO Update : पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनी SME आयपीओ आणणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनीचा SME आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
Ind vs Eng T20 Squad : हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
Torres Scam : ग्राहकांना 14 महागड्या कार गिफ्ट म्हणून दिल्या, एक गाडी शोरुममध्ये ठेवत प्रलोभन दाखवलं, टोरेसचे नवनवे कारनामे समोर  
गुंतवणूकदारांना 14 महागड्या कार गिफ्ट देत प्रलोभन दाखवलं, एक गाडी शोरुममध्ये ठेवली, टोरेसचे कारनामे समोर
Embed widget