एक्स्प्लोर
Advertisement
भारत-चीन सीमावादावर तोडगा निघेल; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रतिक्रिया
भारत-चीन सीमावादावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एबीपी न्यूजशी संवाद साधला. यावेळची परिस्थिती थोडी वेगळी असून सीमावादावर तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारत-चीन सीमेवर तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची एबीपी न्यूजने एक्सक्लूसिव मुलाखत घेतली. भारत-चीन सीमेवरील वाढता तणाव देशाला युद्धकडे घेऊन चालला आहे का? या प्रश्नावर भारताला कधीच कोणत्याही देशासोबत युद्ध नको आहे. शेजारील राष्ट्रांसोबत आम्हाला चांगले संबंध ठेवायचे आहेत. भारत आणि चीनमध्ये पहिल्यापासूनच सीमेवर वाद होत आला आहे. पेट्रोलिंग करताना बऱ्याचवेळा चिनी आणि भारतीय सैन्यात वाद झाला आहे. मात्र, यावेळची परिस्थिती थोडी वेगळी आहे. चीनसोबत चर्चा सुरू असून लवकरच यावर तोडगा काढला जाईल, असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.
चीनची अडचण काय?
भारत आपल्या सीमाभागात इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते तयार करत आहे. यावर चीनला आक्षेप आहे. मात्र, सीमाभागात सुरक्षेसाठी, इथल्या नागरिकांना सुविधा मिळाव्यात म्हणून डेव्हलपमेंट करणे हा देशाचा पूर्वीचाच निर्णय आहे. भारत आपल्या देशात काहीही करू शकतो. तो आमचा निर्णय आहे. चीन देखील त्यांच्या सीमाभागात काहीही करू शकतो. आमचं काहीचं म्हणणं नाही, असं उत्तर राजनाथ सिंह यांनी दिलं.
थ्री इडियट चित्रपटातील रिअल रँचो सोनम वांगचुक यांचं 'बायकॉट मेड इन चायना'चं आवाहन
अमेरिकेचे अध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांनी भारत-चीन सीमावादात मध्यस्थी करण्याची भूमिक मांडली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात कोणतीच चर्चा झाली नसल्याचे माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. नेपाळ सोबत सुरू असलेल्या वादावर बोलताना ते म्हणाले, कुठे काही गैरसमज असतील तर ते चर्चेद्वारे नक्कीच दूर केले जातील.
मध्यस्थीसाठी अमेरिकेचा उतावळेपणा
लडाख सीमेवर लष्कराच्या तैनातीवरुन भारत आणि चीनमधला तणाव सध्या वाढलेला आहे. पण या सगळ्या प्रकरणात अमेरिका मात्र नाहक मध्यस्थीसाठी उतावळी झालीय. गेल्या दोन दिवसांपासून ट्रम्प यांची याबाबत वक्तव्य सुरुच होती. मोदींशी बातचीत न होताच त्यांच्या मनात काय चाललंय हे त्यांनी जाहीर करुन टाकलं. भारत आणि चीनमध्ये जो तणाव वाढला आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? असा प्रश्न विचारल्यावर ट्रम्प यांनी 'मी मोदींशी बोललो, ते काही चीनवरुन चांगल्या मूडमध्ये दिसत नाहीत' असं सांगून टाकलं.
India China Issue | चीनसंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधानांशी संवाद नाही, सूत्रांची माहिती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement