एक्स्प्लोर
संरक्षणमंत्री सीतारमण यांचा अरुणाचल दौरा, चीनचा तीळपापड
सीतारमण यांचा हा दौरा शांतता प्रस्थापित करण्यासाठी अनुकूल नाही अशी वल्गना चीनने केली.
नवी दिल्ली: संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्या अरुणाचल दौऱ्यामुळे चीनचा चांगलाच तीळपापड झाला आहे. सीतारमण यांचा हा दौरा शांतता प्रस्थापित करण्यासाठी अनुकूल नाही अशी वल्गना चीनने केली.
चीनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनिंग म्हणाले की, “भारत आणि चीन यांच्यातील पूर्व सीमेवरुन सध्या वाद सुरु आहे. असं असताना भारतीय संरक्षण मंत्र्यांनी हा दौरा करणं हे शांती प्रस्थापित करण्यासाठी अनुकूल नाही. आम्हाला आशा आहे की सीमा वाद चर्चेने सोडवण्यासाठी भारत चीनच्या प्रयत्नांना मदत करेल”
“सीमेचा वाद सोडवण्यासाठी भारतीय पक्षाला चीनशी चर्चा करायला हवी. त्यामुळे हा वाद न ताणता चर्चेने सुटू शकेल. त्यासाठी तसं वातावरण निर्मिती करणं आवश्यक आहे. आम्हाला आशा आहे भारत चीनला साथ देईल”, असंही चुनिंग म्हणाले.
https://twitter.com/DefenceMinIndia/status/927177955393945600
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement