एक्स्प्लोर
भारत-फ्रान्सच्या राफेल विमान करारावर शिक्कामोर्तब!
नवी दिल्लीः भारत-फ्रान्समधील राफेल युद्ध विमानाच्या खरेदी करारावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. भारत आणि फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांनी राफेल करारावर आज स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार पुढील पाच वर्षात भारताला फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमाने मिळणार आहेत.
36 राफेल विमानांसाठी भारत फ्रान्सला तब्बल 59 हजार कोटी रुपये मोजणार आहे. राफेलची गणना ही जगातल्या अत्याधुनिक लढाऊ विमानांमध्ये केली जाते. राफेलच्या मदतीने भारताच्या हद्दीतून पाकिस्तानवर मारा करता येणार आहे. या विमानात मिटीअर आणि मायका या दोन मिसाईल प्रणाली असतील. पाकिस्तानकडे सध्या असलेल्या प्रणालींपेक्षा ही प्रणाली जास्त संहारक आहे.
20 वर्षात पहिल्यांदाच लढाऊ विमानांची खरेदी
संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी गेल्या आठवड्यात राफेल डील सध्या निर्णायक अवस्थेत असल्याचं सांगितलं होतं. गेल्या 20 वर्षात लढाऊ विमान खरेदी करण्याचा हा पहिलाच निर्णय आहे. या विमानातील अत्याधुनिक मिसाईल्समुळे वायूसेनेला फायदा होणार आहे. भारतीय वायू सेनेच्या ताफ्यात हे विमान दाखल होण्यासाठी जवळपास 18 महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
असा झाला राफेल विमान खरेदी करार
भारताचे 2007 सालापासून फ्रान्सकडून अत्याधुनिक मिसाईल्स असणारे राफेल विमान खरेदी करण्याचे प्रयत्न केले जात होते. मात्र काही अडचणींमुळे या करारात अडथळा येत होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागील वर्षीच्या फ्रान्स दौऱ्यानंतर या खरेदीला वेग आला आणि मोदींना भारत फ्रान्सकडून 36 फायटर जेट्स खरेदी करणार असल्याची घोषणा केली.
यूपीए सरकारच्या काळात फ्रान्सकडून 126 राफेल विमान खरेदीचा निर्णय झाला होता. यापैकी 36 विमान राफेल विमान बनवणारी कंपनी दसाल्ट एव्हिएशनकडून खरेदी करण्यात येणार होते. तर उर्वरित 90 विमान भारतात तयार केले जाणार होते. मात्र पंतप्रधान मोदींनी जुना करार रद्द करत नव्याने खेरदीचा निर्णय घेतला.
मोदींनी करार केल्यानंतरही विमानांच्या किंमतींमुळे व्यवहार अडकून होता. फ्रान्सने भारताकडून 36 विमानांच्या मोबदल्यात 65 हजार कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी ही किंमत कमी करण्याची मागणी केली आणि त्यात त्यांना यशही मिळालं. 59 हजार कोटी रुपयांमध्ये हा करार झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement