एक्स्प्लोर

'हा हिंदूंवर दिवसाढवळ्या झालेला बलात्कारच', केंद्रीय मंत्र्याचे वादग्रस्त विधान

महिलांना प्रवेशबंदी असलेल्या केरळमधील शबरीमाला मंदिरात बुधवारी दोन महिलांनी प्रवेश करत ही परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अनंतकुमार हेगडे यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे.

नवी दिल्ली : "केरळमध्ये शबरीमला मंदिरात महिलांनी प्रवेश करणं हा हिंदूंवर दिवसाढवळ्या झालेला बलात्कारच आहे", असे वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केले आहे. महिलांना प्रवेशबंदी असलेल्या केरळमधील शबरीमला मंदिरात बुधवारी दोन महिलांनी प्रवेश करत ही परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अनंतकुमार हेगडे यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. "केरळमधील शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे हे सरकारचे अपयश आहे. तसेच हा दिवसाढवळ्या हिंदूंवर झालेला बलात्कारच आहे", असे ते म्हणाले. 10 ते 50 वर्षांच्या महिलांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखता येणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी दिला होता. मात्र या आदेशानंतरही महिलांच्या मंदिर प्रवेशाला मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात येत आहे. शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाच्या मागणीसाठी मंगळवारी केरळमध्ये मानवी साखळी बनवणाऱ्या महिलांवर भाजप-आरएसएसच्या काही कथित कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. या लोकांनी मीडिया प्रतिनिधी आणि पोलिसांवरही दगडफेक केली. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही सनातनी मंडळींनी महिलांच्या सबरीमला मंदिर प्रवेशाला विरोध केला आहे. शिवाय भाजपनेही कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन महिलांच्या मंदिर प्रवेशावर आक्षेप घेतला आहे. या मुद्द्यावरुन आज केरळ बंदची हाक देण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मराठी फिल्म इंडस्ट्रीला उद्योगाचा दर्जा, अनुवाद अकादमीही सुरु करण्याचा निर्णय : उदय सामंत 

बेळगाव, कारवार जोडलं जाईल, तेव्हाच महाराष्ट्र पूर्ण होईल; महाराष्ट्र दिनी अजित पवारांनी ठणकावून सांगितलं

दहशवाद्यांनी हल्ल्यासाठी 22 एप्रिलच तारीख का निवडली? NIA च्या तपासातून समोर आली माहिती

महाराष्ट्र दिनाचे औचित्य, शिवाजी विद्यापीठात ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ पुस्तकाचे प्रकाशन
महाराष्ट्र दिनाचे औचित्य, शिवाजी विद्यापीठात ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ पुस्तकाचे प्रकाशन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07AM TOP Headlines 02 May 2025Special Report : Jammu Kashmir Amusement Park : पहलगामच का? 22 एप्रिलच का? हल्ल्यासाठी दहशतवाद्यांकडून आणखी 4 ठिकाणांची रेकीSpecial Report : Pakistan Scared Of India : पाकला घाबरला, हे घ्या ५ पुरावे!Special Report : Pakistan Jammer : पाकिस्तान गॅसवर, बसवले 'जॅमर', हल्ल्याच्या भीतीने पाकड्यांची उडाली झोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठी फिल्म इंडस्ट्रीला उद्योगाचा दर्जा, अनुवाद अकादमीही सुरु करण्याचा निर्णय : उदय सामंत 
मराठी फिल्म इंडस्ट्रीला उद्योगाचा दर्जा, अनुवाद अकादमीही सुरु करण्याचा निर्णय : उदय सामंत 
बेळगाव, कारवार जोडलं जाईल, तेव्हाच महाराष्ट्र पूर्ण होईल; महाराष्ट्र दिनी अजित पवारांनी ठणकावून सांगितलं
बेळगाव, कारवार जोडलं जाईल, तेव्हाच महाराष्ट्र पूर्ण होईल; महाराष्ट्र दिनी अजित पवारांनी ठणकावून सांगितलं
दहशवाद्यांनी हल्ल्यासाठी 22 एप्रिलच तारीख का निवडली? NIA च्या तपासातून समोर आली माहिती
दहशवाद्यांनी हल्ल्यासाठी 22 एप्रिलच तारीख का निवडली? NIA च्या तपासातून समोर आली माहिती
महाराष्ट्र दिनाचे औचित्य, शिवाजी विद्यापीठात ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ पुस्तकाचे प्रकाशन
महाराष्ट्र दिनाचे औचित्य, शिवाजी विद्यापीठात ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ पुस्तकाचे प्रकाशन
Prakash Mahajan on Sharad Pawar : शेवटी शरद पवारांना हिंदू धर्माला शरण जावंच लागलं, ते स्वतःची मुंज झालेली पण दाखवू शकतात; प्रकाश महाजनांचा खोचक टोला
शेवटी शरद पवारांना हिंदू धर्माला शरण जावंच लागलं, ते स्वतःची मुंज झालेली पण दाखवू शकतात; प्रकाश महाजनांचा खोचक टोला
धक्कादायक! महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम उरकताच मुख्याध्यापकास जबर मारहाण, दुचाकीही जाळली

संविधानाचा मूळ पाया कुणालाही..; जातनिहाय जणगणनेवर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांची पहिली प्रतिक्रिया

मॅगी, मोमोज खावा, अजून खूप फिरायचं बाकीय; दहशतवादी हल्ल्यापूर्वी 4-5 जणांनी घेरलं, प्रत्यक्षदर्शींने सांगितला थरारक प्रसंग

Embed widget