एक्स्प्लोर
दाऊदला भारतात यायचंय, वकिलाची माहिती
दाऊदच्या वकिलांची दाऊदशी बातचित कशी झाली? असा प्रश्न ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी उपस्थित केला आहे.

फाईल फोटो
मुंबई : भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिमला भारतात परत यायचं असून त्याच्या काही अटी आहे, अशी माहिती दाऊदचे वकील श्याम केसवानी यांनी दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
खरं तर या आधीही दाऊदने भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांच्याकरवी दाऊदने ही इच्छा व्यक्त केली होती. पण ही फक्त दाऊदची खेळी असल्याचं मत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं आहे. उलट दाऊदच्या वकिलांची दाऊदशी बातचित कशी झाली? असा प्रश्न निकम यांनी उपस्थित केला आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद
गुन्हेगारी विश्वातील क्रूरकर्मा म्हणून दाऊद कुप्रसिद्ध आहे. 2003 मध्ये अमेरिकेने ग्लोबल टेररिस्ट म्हणूनही त्याला घोषित केले आहे. इंटरपोलसुद्धा दाऊदच्या शोधात आहेत. 2011 साली फोर्ब्सने जगातील सर्वात खतरनाक गुन्हेगारांच्या यादीत दाऊदचा समावेश केला होता.
26 नोव्हेंबर 1955 रोजी दाऊदचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात झाला. दाऊदचे वडील मुंबई पोलिसात कॉन्स्टेबल होते. मात्र पैसे कमावण्याच्या हेतूने दाऊदने काळ्या मार्गाचा वापर केला आणि नंतर तो अंडरवर्ल्ड जगताचा बेताज बादशाह बनला.
12 मार्च 1993 रोजी मुंबईतील 13 जागी बॉम्बस्फोट करण्यामागे दाऊदचा हात होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
