Mercedes-Benz GLC 220d कारने प्रवास करत होते सायरस मिस्त्री, जाणून घ्या किती सुरक्षित होती ही कार
Cyrus Mistry Car: उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे रविवारी निधन झाले. रस्ते अपघातात त्यांना जीव गमवावा लागला. या अपघातात सायरस मिस्त्री यांची मर्सिडीज बेंझ जीएलसी 220 डी 4 मॅटिक (Mercedes Benz GLC 220 D 4Matic) कार दुभाजकावर आदळली. मुंबई
Cyrus Mistry Car: उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे रविवारी निधन झाले. रस्ते अपघातात त्यांना जीव गमवावा लागला. या अपघातात सायरस मिस्त्री यांची मर्सिडीज बेंझ जीएलसी 220 डी 4 मॅटिक (Mercedes Benz GLC 220 D 4Matic) कार दुभाजकावर आदळली. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सूर्या नदीवरील पुलावर हा अपघात झाला. आज दुपारी 3.30 च्या सुमारास हा अपघात झाला. मर्सिडीज कार अत्यंत सुरक्षित मानली जात असली तरीही ही कार मिस्त्री यांचे प्राण का वाचवू शकली नाही, हा मोठा प्रश्न आहे. चला जाणून घेऊया या कारबद्दल अधिक माहिती.
Mercedes-Benz GLC 220d 4MATIC
मर्सिडीज-बेंझ GLC 220d 4MATIC प्रोग्रेसिव्ह कार ही GLC लाइनअपचे डिझेल प्रकार आहे. या मर्सिडीज कारमध्ये 1950cc डिझेल इंजिन आहे. जे 3800 rpm वर 192 bhp ची पॉवर आणि 1600 rpm वर 400 Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही कार फक्त हेड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे. या कारची किंमत 61.07 लाख रुपये आहे. मर्सिडीजने 2021 मध्ये या कारचे उत्पादन बंद केले आहे.
किती सुरक्षित आहे ही कार?
Mercedes-Benz GLC 220d 4MATIC च्या सुरक्षेबद्दल बोलायचे झाले तर, यात फ्रंट पॅसेंजर कर्टन एअरबॅग, ड्रायव्हर कर्टन एअरबॅग, रिअर पॅसेंजर कर्टन एअरबॅग, ड्रायव्हर फ्रंटल एअरबॅग, फ्रंट पॅसेंजर, ड्रायव्हर फ्रंटल एअरबॅग, ड्रायव्हर फ्रंटल एअरबॅग अशा एकूण 7 एअरबॅग मिळतात. कारच्या इतर सेफ्टी फीचर्समध्ये हिल असिस्ट, इंजिन इमोबिलायझर, ASR/ट्रॅक्शन कंट्रोल, 360-डिग्री कॅमेरा, ऑटो-डिमिंग रीअर-व्ह्यू मिरर, डोअर अलार्म वॉर्निंग, ISOFIX (चाइल्ड-सीट माउंट), सेंट्रल लॉक सिस्टम, ABS (अँटी. - लॉक ब्रेकिंग सिस्टम), ईबीडी (इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन), ईएसपी (इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम), ईबीए (इलेक्ट्रॉनिक ब्रेक असिस्ट), हाय स्पीड अलर्ट सिस्टम, पॅसेंजर साइड सीट-बेल्ट रिमाइंडर, लेन वॉच कॅमेरा/साइड मिरर कॅमेरा आहे.
या मर्सिडीज GLC 220d च्या सुरक्षेबद्दल बोलायचे झाले तर ही कार बनवण्यासाठी अनेक सेफ्टी फीचर्सचा वापर करण्यात आला आहे. पण तरीही अपघातात मृत्यू झाल्याने या गाडीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अपघाताच्या वेळी या वाहनातील सुरक्षा फीचर्स काम करत नव्हती किंवा ते चालू स्थितीत नव्हते याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. राज्य सरकारने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
संबंधित बातमी:
Cyrus Mistry : कार अपघातात सायरस मिस्त्री यांचं निधन, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
Cyrus Mistry : टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यातील नेमका वाद काय? 'या' सहा आरोपांमुळे मिस्त्रींना सोडावं लागलं होतं अध्यक्षपद