एक्स्प्लोर

वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा परतीचा प्रवास कसा असेल?

अभिनंदन सध्या इस्लामाबादमध्ये असून त्यांना शुक्रवारी दुपारी विमानाने लाहोरला आणण्यात येईल. त्यानंतर वाघा बॉर्डरमार्गे त्यांना भारताकडे सुपूर्द केले जाईल. भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातून त्यांना अमृतसर एअर बेसला आणण्यात येईल. तिथून ते राजधानी दिल्लीला रवाना होतील.

मुंबई : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान अवघ्या काही तासात मायदेशी परतणार आहेत. अभिनंदन यांच्या परतीची वेळ अद्याप निश्चित झालेली नसली, तरी बीटिंग द रिट्रीटच्या वेळी त्यांना भारताकडे सुपूर्द केलं जाण्याची शक्यता आहे. अभिनंदन यांना दुपारपर्यंत आणले जावे, अशी भारताची मागणी आहे. पाकिस्तानने मात्र बीटिंग द रिट्रीटच्या वेळी अभिनंदन यांना सुपूर्द करणार असल्याचं सांगितलं आहे. भारताच्या दबावापुढे झुकलेल्या पाकिस्तानने आपल्या ताब्यातील भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्याची तयारी दर्शवली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत यांची घोषणा केली.
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वैमानिकाच्या वडिलांचं देशवासियांना भावूक पत्र
अभिनंदन सध्या इस्लामाबादमध्ये असून त्यांना शुक्रवारी दुपारी विमानाने लाहोरला आणण्यात येईल. त्यानंतर वाघा बॉर्डरमार्गे त्यांना भारताकडे सुपूर्द केले जाईल. भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातून त्यांना अमृतसर एअर बेसला आणण्यात येईल. तिथून ते राजधानी दिल्लीला रवाना होतील. पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी बुधवारी सकाळी (27 फेब्रुवारी) हवाई हद्दीचं उल्लंघन करत भारतात प्रवेश केला होता. जम्मू काश्मिरच्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने घुसखोरी केली. भारतीय वायुसेनेने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानच्या विमानांना पळ काढला. मात्र या कारवाईत भारताचं एक मिग 21 विमान दुर्घटनाग्रस्त झालं.
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वैमानिकाची सुटका होणार, इम्रान खान यांची घोषणा
 अभिनंदन वर्धमान अपघातग्रस्त विमानातून पॅराशूटने बाहेर पडले. मात्र पाकव्याप्त काश्मिरमधील भिंबर जिल्ह्यातील एका गावात उतरले. त्यांनी ही कुठली जागा असल्याची विचारणा केली असता, एका नागरिकाने हा भारत असल्याची खोटी माहिती दिली.
 VIDEO | असे सापडले विंग कमांडर अभिनंदन पाकच्या ताब्यात
स्थानिकांच्या वेशभूषेवरुन अभिनंदन यांना संशय आला आणि त्याने 'जय माता दी' अशी घोषणा दिली. मात्र त्याला जयघोषात उत्तर न आल्यामुळे आपण पाकिस्तानात असल्याची अभिनंदन यांची खात्री पटली. त्याक्षणी त्यांनी उपस्थितांच्या दिशेने पिस्तूल रोखली. अभिनंदन यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र जमावाने त्यांच्यावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. जखमी असल्यामुळे ते अर्धा किलोमीटरपेक्षा जास्त पळू शकले नाहीत.
गोष्ट नचिकेताची.. कारगिल युद्धात पाकिस्तानच्या तावडीतून भारतात परतलेला वैमानिक
शत्रू पाकिस्तानींच्या घेरावात असतानाही अभिनंदन डगमगले नाहीत. संतप्त जमावाच्या हाती लागण्याआधीच त्यांनी स्वतःकडे असलेली महत्त्वाची कागदपत्रं आणि नकाशे खाऊन टाकले, तर काही पाण्यात भिजवले. पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याकडून गुपित उकळण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांनी आपलं नाव आणि बॅच नंबर याशिवाय कोणतीही माहिती दिली नाही. ''शांतीचा संदेश देताना आम्ही भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांची उद्या सुटका करु" अशी घोषणा इम्रान खान यांनी केल्यानंतर सभागृहात उपस्थित खासदारांनी टाळ्या वाजवून प्रस्तावाचं स्वागत केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली

Embed widget