'या' भारतीय क्रिकेटपटूच्या वडील आणि बहिणाचा काँग्रेसमध्ये प्रवेश, तर पत्नी भाजपची सदस्य
रविंद्र जाडेजाच्या पत्नीने गेल्या महिन्यात 3 मार्च रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता. रिवाला भाजपकडून लोकसभेचे तिकीट देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे.
अहमदाबाद : क्रिकेटर रविंद्र जाडेजाची पत्नी रिवा जाडेजाने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर महिनाभरातच आता त्याची बहिण आणि वडिलांनी काँग्रेसचा हात धरला आहे. रविंद्र जाडेजाची बहिण नैना जाडेजा आणि वडिल अनिरुद्ध सिंह जाडेजा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
पाटीदार नेते हार्दिक पटेल, काँग्रेस आमदार विक्रम माडम यांच्या उपस्थितीत जाडेजाच्या वडील आणि बहिणीने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जाडेजा जामनगरमधील रहिवाशी आहे. त्यामुळे यावेळी जामनगरमधील काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार मुलु कंडोरियाही उपस्थित होते.
रविंद्र जाडेजाच्या पत्नीने गेल्या महिन्यात 3 मार्च रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता. रिवाबाला भाजपकडून लोकसभेचे तिकीट देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र भाजपने जामनगरमधून रिवाला तिकीट दिलं तर तिच्या उमेदवारीला घरातूनच विरोध होईल, असं बोलले जाते. रिवाबा करणी सेनेची महिला विभाग अध्यक्षही आहे.
गुजरातमध्ये लोकसभेसाठीच्या 26 जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होणार आहे.
VIDEO | खासदार उदयनराजे भोसलेंचं तडफदार भाषण