एक्स्प्लोर
माकप खासदाराला अलिशान जीवनशैली महागात, पक्षातून निलंबन

नवी दिल्ली : आपल्या साध्या जीवनशैलीमुळे डावे ओळखले जातात. मात्र, माकपच्या राज्यसभेच्या खासदाराने अलिशान जीवनशैली स्वीकारल्याने पक्षाने त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई केली. राज्यसभेतील मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे खासदार रिताब्रता बॅनर्जी यांना 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. महागडं पेन आणि अॅपलचं आयवॉच वापरल्यानं पक्षानं ही कारवाई केली आहे. 12 फेब्रुवारी रोजी रिताब्रता कोलकात्यात मोहन बागान या फुटबॉल क्लबची मॅच पाहायला गेले होते. त्यावेळचा त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यात त्यांच्या खिशाला मोंट ब्लॅक हे महागडं पेन आणि हातात अॅपल आयवॉच होतं. कम्युनिस्ट पक्षाचा नेता अशा महागड्या वस्तू कसा वापरु शकतो, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यानंतर पक्षाकडून ही कारवाई करण्यात आली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ट्रेडिंग न्यूज
महाराष्ट्र
भारत























