(Source: ECI/ABP News/ABP Majha)
COVID 19 Vaccine: फायझर, सीरमनंतर 'या' कंपनीचा कोरोना लस आपत्कालीन वापरासाठी DCGI कडे अर्ज
COVID 19 Vaccine: भारत बायोटेकने 'कोवॅक्सिन'च्या आपत्कालीन वापरासाठी DCGI कडे परवानगी मागितली आहे.
COVID 19 Vaccine : फायझर आणि सीरम इन्स्टिट्यूटनंतर आता भारत बायोटेकने स्वदेशी पद्धतीने विकसित 'कोवॅक्सिन' या लसीच्या तातडीच्या वापरासाठी डीसीजीआयची (DCGI) परवानगी मागितली आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे.
आजचं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) कोविड -19 संसर्गावरील 'कोविशील्ड' या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगीसाठी ड्रग्स ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडे अर्ज केला आहे.
यापूर्वी अमेरिकेच्या फार्मा क्षेत्रातील दिग्गज कंपनीने फायझरने फार्मास्युटिकल सेक्टरच्या नियामकाकडे अशीच परवानगी मागितली होती. परवानगी विचारणारी फायझर ही पहिली कंपनी आहे. यासाठी युके आणि बहरीनमध्ये फायझरला यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे.
पुणे स्थित कंपनी एसआयआयने ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि फार्मा कंपनी अॅस्ट्रा जेनेकाशी लस विकसित करण्यासाठी करार केला आहे. सध्या ही कंपनी भारतात या लसीची चाचणी घेत आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) च्या म्हणण्यानुसार, सीरम संस्थेने यापूर्वीच डीसीजीआयच्या 'अॅट रिस्क मॅन्युफॅक्चरिंग अँड स्टॉकपाईलिंग' परवान्याअंतर्गत या लसीचे चार कोटी डोस तयार केले आहेत.
संबंधित बातम्या :