लसीवरून राजकारण! जगातील राष्ट्रप्रमुखांनी लस घेतली, मग मोदी सरकारमधील नेते मागे का? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल
एकीकडे लसीकरणाचा कार्यक्रम आज देशात सुरू झाला तर दुसरीकडे विरोधकांनी या कार्यक्रमाबद्दल प्रश्न उपस्थित करत सरकारवर तोफ डागली आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी आज संपूर्ण देशभरात लसीकरणाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे. मेड इन इंडिया हा नारा यशस्वी झाल्याने इतर देशांच्या तुलनेत भारतात स्वस्त लस उपलब्ध होत असल्याचा दावा पंतप्रधानांनी केला. तर दुसरीकडे या प्रक्रियेत नियमांचं पालन झालं असल्याचा दावा करत विरोधकांनी तोफ डागली आहे.
एकीकडे लसीकरणाचा कार्यक्रम आज देशात सुरू झाला तर दुसरीकडे विरोधकांनी या कार्यक्रमाबद्दल प्रश्न उपस्थित करत सरकारवर तोफ डागली आहे. या टीकेत सर्वात आघाडीवर काँग्रेस आहे. लसीच्या परवानगीबाबत जी प्रक्रिया पाळायला हवी होती ती न पाळताच सरकार हा कार्यक्रम सुरू करत असल्याची टीका खासदार मनोज तिवारी यांनी केली. शिवाय इतक्या मोठ्या समूहाला लसीकरण होत असेल तर मग अद्याप इमर्जन्सी यूज अथोरायझेशन अशीच परवानगी का आहे हा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तीन जानेवारीला देशात दोन लसींना एकाच वेळी परवानगी मिळाली. त्यातही ज्या भारत बायोटेक या सरकारी लशीला परवानगी दिली गेली त्यात पुरेसा डेटा उपलब्ध नसतानाच घाई झाल्याचा आरोप विरोधक करत आलेत. विशेष म्हणजे कुठली लस घ्यायची हा पर्याय नागरिकांना उपलब्ध नसणार आहे. त्यात या लसीबद्दल संशय असतानाही सरकार ती का रेटतंय? हा सवाल तिवारी यांनी उपस्थित केला आहे.
जगातल्या अनेक देशात त्या-त्या राष्ट्र प्रमुखांनी सर्वात आधी लस टोचून घेतली आहे. जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी मोदींनीही ते पाऊल उचलावे अशी देखील मागणी विरोधक करत आहेत.
जगातला सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम असं म्हणत सरकारने आपली तयारी सुरू केली आहे. लसीकरणाबाबत पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भरतेचा नारा यशस्वी झाल्याचा दावा केला आहे तर दुसरीकडे याच लसीवरून जोरदार राजकारण देखील सुरू असल्याचे दिसत आहे.
संबंधित बातम्या :
Covid 19 Vaccination |लस मिळाली असली तरी उत्तम लस म्हणजे तोंडावरील मास्क : CM Uddhav Thackeray UNCUT