भारतातील Hetero कंपनीच्या कोरोनावरील औषध Nirmacom ला WHO कडून मान्यता
Covid-19 Oral Antiviral Treatments: भारतीय कंपनी Hetero च्या कोरोनावरील औषधाला जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) मान्यता दिली आहे. गंभीर रुग्णांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
Covid-19 Oral Antiviral Treatments: कोरोनाला रोखण्यासाठी भारतातील आघाडीची औषध कंपनी हेटेरो (Hetero) नं बनवलेल्या नवीन औषधाला जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) मान्यता दिली आहे. Hetero च्या कोविड-19 ओरल अँटीव्हायरल ट्रीटमेंट निर्मत्रेलवीर (Nirmatrelvir) चे जेनेरिक व्हर्जन आलं आहे. ज्याचं वर्णन कंपनीनं कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी उपयुक्त असं केलं आहे. मात्र, रुग्णांना हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानंच मिळेल. Hetero नं 'Nirmacom' या ओरल औषधाच्या रूपात कॉम्बो पॅक लॉन्च केला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) असं म्हटलंय की, "भारतातील आघाडीची औषध कंपनी Hetero नं कोरोना महामारी रोखण्यासाठी एक औषध बनवलं आहे. Hetero चे 'Nirmacom' हे Pfizer च्या Covid-19 ओरल अँटीव्हायरल औषध 'Paxlovid' चं जेनेरिक वर्जन आहे. गंभीर रुग्णांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. मात्र, रुग्णानं ते डॉक्टरांच्या सल्ल्यानंच घ्यावं."
कोविड युद्धात आणखी एक शस्त्र
भारतातील हेटेरो ग्रुप ऑफ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. वामसी कृष्णा बंदी यांनी यासंदर्भात बोलताना म्हटलंय की, आमच्या कोविड-19 ओरल अँटीव्हायरल ट्रिटमेंट Nirmatrelvir'निरमाकॉम' च्या जेनेरिक आवृत्तीला WHO नं मान्यता दिली आहे. ते म्हणाले की, हे औषध कोविडविरुद्धच्या लढाईत फायदेशीर ठरेल. डॉ. वामसी म्हणाले, "आमच्या औषधासाठी WHO पूर्व पात्रता मिळवणं हा COVID-19 विरुद्धच्या लढ्यात एक महत्त्वाचा टप्पा आहे. कारण यामुळे आम्हाला हे नाविन्यपूर्ण अँटीरेट्रोव्हायरल औषध गरजूंपर्यंत पोहोचवता येईल."
स्वस्त दरात औषधं उपलब्ध करून देण्यावर भर द्या
डॉ. वामसी म्हणाले, "WHO नं रुग्णालयात दाखल केलेल्या उच्च-जोखीम असलेल्या रुग्णांसाठी तसेच मध्यम आणि कमी जोखीम असलेल्या कोविड रुग्णांसाठी निर्मत्रेलवीर आणि रिटोनावीरची शिफारस केली आहे. आम्ही Nirmacom ला 95 LMIC मध्ये परवडणाऱ्या किमतीत वेगानं उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत." तसेच, भारतातील अग्रगण्य औषध कंपनी Hetero च्या निवेदनात असंही सांगण्यात आलं आहे की, जागतिक आरोग्य संघटनेनं प्रीक्वालिफिकेशन ऑफ मेडिसिन्स प्रोग्राम (WHO PQ) नं आमच्या तोंडी अँटीव्हायरल उपचार Nirmatrelvir च्या अनुवांशिक आवृत्तीला मान्यता दिली आहे. जी कोविड-19 चा सामना करण्यासाठी आवश्यक आहे, असं कंपनीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :