एक्स्प्लोर
Advertisement
डीएसकेंची पत्नीसह येरवडा जेलमध्ये रवानगी होणार
ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना आज न्यायालयाने 15 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पुणे : ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना आज न्यायालयाने 15 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता डीएसके आणि हेमंती यांची रवानगी येरवडा जेलमध्ये होणार आहे.
डीएसके यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. सरकारी वकिलांनी आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने त्यांना 15 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
डीएसके यांच्या वकिलांनी डीएसके यांच्या तब्येतीचं कारण देत, त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेऊ देण्याची विनंती केली.
येरवडा जेलमध्ये तातडीच्या क्षणी त्यांना वैद्यकीय मदत मिळणार नाही, ससून हॉस्पिटलमध्ये चांगले उपचार केले जात नाहीत, अशी कारणं देत काही घडल्यास कोण जबाबदार राहील? असं सांगत खासगी रुग्णालयात दाखल करावी, अशी मागणी डीएसकेंच्या वकिलाने केली. मात्र सरकारी वकिलांनी हा मुद्दा खोडून काढत, आज दुपारी डीएसके दाम्पत्याची ससूनमध्ये सर्व तपासणी करण्यात आली असून सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आहेत, तसेच गरज पडल्यास उपचाराच्या सर्व सुविधा ससूनमध्ये उपलब्ध असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर न्यायालयाने डीएसके यांची मागणी फेटाळली. त्यामुळे आता त्यांची रवानगी येरवडा जेलमध्ये करण्यात येणार आहे.
डीएसकेंना नोव्हेंबरमध्ये अंतरिम संरक्षण देताना गुंतवणुकदारांचे 50 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते. मात्र, ही रक्कम जमा करण्यात डीएसकेंना वारंवार अपयश आलं. त्यामुळे मुंबई हायकोर्टाने डीएसकेंना अटकेपासून दिलेलं संरक्षण काढून घेतलं. त्यानंतर डीएस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना दिल्लीतील डीएमआर सिएट या हॉटेलमधून अटक करण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
क्राईम
निवडणूक
Advertisement