एक्स्प्लोर
कोर्टाचा आदेश- “घरी परतल्यानंतर पत्नीला रोज विचारायचं- कैसी हो डार्लिंग?”
भोपाळ (मध्यप्रदेश) : पती-पत्नीला वेगळे होण्यापासून वाचवण्यासाठी मध्य प्रदेशातील कोर्टाने अनोखी शक्कल लढवली आहे. रोज घरी परतल्यानंतर आपल्या पत्नीला ‘कैसी हो डार्लिंग’ असे म्हणण्याचा आदेश कोर्टाने दारुड्या पतीला दिला आहे.
खरगोन भागातील 23 वर्षीय हेमलता 2013 साली 25 वर्षीय अभिषेकसोबत विवाहबंधनात अडकली. सहा-सात महिन्यांनंतर दोघांमध्ये भांडणं सुरु झाली.
पत्नी हेमलाताचा आरोप आहे की, “अभिषेक रोज दारु पिऊन घरी परततो आणि मारझोडही करतो. यामध्ये सासूही अभिषेकला मदत करते. त्यामुळेच मला या सर्व प्रकारामुळेच सासर सोडून माहेरी यावं लागलं.”
पती अभिषेकने हेमलतावर आरोप केला आहे की, “हेमलात लहान-सहान गोष्टींरुन भांडण करायला सुरुवात करते. त्यामुळे घरातील वातावरण खराब होतं.”
यादरम्यान, अभिषेकने खरगोन आणि धार कोर्टात हेमलताशी घटस्फोटाची मागणी केली. या प्रकरणावर सुनावणीदरम्यान कोर्टाने दोघांचंही काऊन्सिलिंग केलं आणि दोघांचीही समजूत काढली.
त्यानंतर कोर्टाने अभिषेकला आदेश दिले आहेत की, घरी परतल्यानंतर रोज आपल्या पत्नीला म्हणजेच हेमलताला “कैसी हो डार्लिंग” असे म्हणावं लागेल. यामुळे पती-पत्नीमधील नातं आणखी घट्ट होईल, असा कोर्टाचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे कोर्टाच्या या आदेशाचं पालन करण्यास अभिषेकने सहमती दर्शवली आहे आणि दोघेही पती-पत्नी आता एकत्र नांदण्यास तयार झाले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement