एक्स्प्लोर
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण
देशभरात आज भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून आज 70 वर्ष पूर्ण होत आहेत.
नवी दिल्ली: देशभरात आज भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून आज 70 वर्ष पूर्ण होत आहेत.
याच पार्श्वभूमीवर देशभरात विविध कार्यक्रमाच आयोजनही करण्यात आलं आहे. सकाळी 7.30 वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लालकिल्ल्यावर ध्वजारोहण झालं.
दरम्यान तत्पूर्वी पंतप्रधान मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मुंबईत मध्यरात्री ध्वजारोहण
मुंबईतील मुंलुंडमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार शिशिर शिंदे यांच्या नेतृत्वात मध्यरात्री 12 वाजता ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. मुलुंडच्या संभाजी पार्कमध्ये हा कार्यक्रम झाला, यावेळी भारतीय महिला क्रिकेट संघातील डॅशिंग फलंदाज पूनम राऊतने हजेरी लावली होती. तिच्या हस्ते यंदाचं ध्वजारोहण करण्यात आला.
सोमय्यांचं ध्वजारोहण
तर तिकडे भाजपचे खासदार किरीट सोमय्यांनी कांजूरमध्ये ध्वजारोहण केलं. याबाबतचा व्हिडीओ त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला.
https://twitter.com/KiritSomaiya/status/897187112403050499
बिहारमध्ये ध्वजारोहण
गेल्या अनेक वर्षांपासून बिहारच्या झेंडा चौकात स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय ध्वजारोहण करतात. यावर्षी सुद्धा स्वातंत्र्यासैनिकांच्या कुटुंबियांनी एकत्र येत मध्यरात्री ध्वजारोहण करत तिरंग्याला सलामी दिली.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा संदेश
न्यू इंडियामध्ये गरिबीला कोणतेही स्थान नसेल असं प्रतिपादन स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना केलं. रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती म्हणून पहिल्यांदाच देशाला संबोधित केलं आणि स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement