Corona | देशात सर्वात जास्त अॅक्टिव्ह रुग्ण बंगळुरु जिल्ह्यात, पुणे दुसऱ्या क्रमांकावर
बंगळुरु जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 1.49 लाख कोरोनाची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या असून त्यानंतर पुणे जिल्ह्यात 1.16 लाख अॅक्टिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवल्याचं दिसून येतंय. देशातील अनेक भागात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. देशातील सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण कर्नाटकातील बंगळुरु जिल्ह्यात सापडले आहेत. या जिल्ह्यात एक लाख 49 हजार 624 इतके अॅक्टिव्ह रुग्ण सापडले आहेत. अॅक्टिव्ह रुग्णसंख्येचा विचार करता पुण्याचा देशात दुसरा क्रमांक लागत असून या जिल्ह्यात 1.16 लाखाहून जास्त अॅक्टिव्ह रुग्ण आढळतात.
गेल्या 24 तासात एकट्या बंगळुरु जिल्ह्यामध्ये कोरोनाचे 16 हजार 662 नवीन रुग्ण सापडले असून आता या जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही एक लाख 49 हजार 624 इतकी झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये सध्या एक लाखाच्या जवळ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 81 हजार 174 अॅक्टिव्ह रुग्ण सापडतात.
कर्नाटकमध्ये रुग्ण वाढले
गेल्या 24 तासात कर्नाटकमध्ये 27 हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 190 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 12.74 लाख इतकी झाली असून 14 हजार 75 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 2.14 लाख इतकी आहे.
राज्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी केंद्र सरकारकडे 1,471 टन ऑक्सिजनची मागणी केली आहे तसेच दोन लाख रेमडेसिवीरच्या इजेक्शनची मागणी केली आहे.
देशातील परिस्थिती चिंताजनक
शुक्रवारी एकाच दिवसात देशात तीन लाख 46 हजार 786 रुग्णांची भर पडली आहे. देशातील वाढती रुग्णसंख्या ही चिंताजनक असून त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. गेल्या 24 तासात 2624 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत वाढ झाली असून ती आता 25 लाख 52 हजार 940 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात दो
महत्वाच्या बातम्या :