Coronavirus India : देशात 24 तासांत 6987 कोरोनाबाधितांची नोंद, 162 जणांचा मृत्यू
Coronavirus Updates : देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर देशात खबरदारीचे उपाययोजना आखल्या जात आहेत.

Coronavirus in India : देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून प्रशासनाची चिंता वाढली आहे. ओमायक्रॉनबाधितांचीही संख्या वाढत आहे. देशात मागील 24 तासांमध्ये 6 हजार 987 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, 162 जणांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या 76 हजार 766 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. तर, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 3 कोटी 42 लाख 30 हजार 354 इतकी झाली आहे. या महासाथीच्या आजारामुळे आतापर्यंत देशात चार लाख 79 हजार 682 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना महासाथीच्या आजाराला नियंत्रित करण्यासाठी सरकारकडून लसीकरण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत 141 कोटी 30 लाख लशीचे डोस देण्यात आले आहेत.
राज्यातही कोरोनाबाधितांची संख्येत वाढ
महाराष्ट्रात शनिवारी 1485 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 796 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात आतापर्यंत 65 लाख 2 हजार 39 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.68 टक्के आहे. शनिवारी राज्यात दोन कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 9 हजार 102 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 92 हजार 048 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 887 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दोन ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात शनिवारी दोन ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत 110 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 57 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- पंतप्रधानांकडून लसीकरणाबाबत मोठ्या घोषणा, महाराष्ट्राचं नियोजन कसं? आरोग्यमंत्री टोपे म्हणाले...
- PM Modi about Vaccine for children : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तीन मोठ्या घोषणा, बूस्टर डोसबाबतही महत्त्वाची माहिती
- COVID-19 Vaccine for Children : 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला DCGI ची परवानगी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
