Coronavirus Cases India Highlights : देशात पहिल्यांदाच 2.73 लाख नवे रुग्ण, गेल्या 24 तासांत 1619 कोरोनाबाधितांचा मृत्यू
Coronavirus Cases India Highlights : भारतात कोरोना व्हायरस महामारीची दुसरी लाट सप्टेंबर 2020 मध्ये आलेल्या पहिल्या लाटेहून अधिक भयावह आहे. कारण नव्या लाटेत नव्या कोरोना बाधितांची वाढ झपाट्यानं होत आहे. गेल्या 24 तासांत 273,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
![Coronavirus Cases India Highlights : देशात पहिल्यांदाच 2.73 लाख नवे रुग्ण, गेल्या 24 तासांत 1619 कोरोनाबाधितांचा मृत्यू Coronavirus Cases Updates India Reports 273810 New COVID-19 Cases 1619 Deaths 144178 Discharges in last 24 Hours Coronavirus Cases India Highlights : देशात पहिल्यांदाच 2.73 लाख नवे रुग्ण, गेल्या 24 तासांत 1619 कोरोनाबाधितांचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/18/a0b6281c420f2857f4f660bf45fb962b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Coronavirus Cases India Highlights : देशात कोरोना बाधितांच्या संख्येनं आतापर्यंत सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत. दररोज कोरोनाबाधितांचा आकडा नवा उच्चांक गाठत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 273,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1619 कोरोनाबाधित रुग्णांना आपले प्राण गमवाव लागले आहेत. दरम्यान, 1,44,178 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याआधी राज्यात शनिवारी 261,500 नव्या कोरोन बाधितांची नोंद झाली होती.
देशातील आजची कोरोना स्थिती :
एकूण कोरोना बाधित रुग्ण : एक कोटी 50 लाख 61 हजार 919
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 29 लाख 53 हजार 821
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 19 लाख 29 हजार 329
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 1 लाख 78 हजार 769
देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 12 कोटी 28 लाख 52 हजार 566 डोस
राज्यात 1 मेपर्यंत कलम 144 लागू
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. रविवारी पुन्हा एकदा राज्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. रविवारी 68 हजार 631 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर काल 45 हजार 654 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 31 लाख 6 हजार 828 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 70 हजार 388 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 80.92 टक्के झाले आहे. राज्यात काल मृतांचा आकडाही 500 च्या वर गेला आहे. काल एकूण 503 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर 1.58 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 60 हजार 473 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल नोंद झालेल्या 503 मृत्यूंपैकी 210 मृत्यू मागील 48 तासातील आहेत. तर 128 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 165 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीतील आहेत. राज्यात सरकारनं 1 मेपर्यंत कलम 144 लागू करण्यात आलं आहे.
आतापर्यंत 12 कोटी 38 लाख लोकांना लसीचे डोस
देशात 16 जानेवारी रोजी कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. 18 एप्रिलपर्यंत देशभरात 12 कोटी 38 लाख 52 हजार 566 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, रविवारी 12 लाख 30 हजार लसीचे डोस देण्यात आले. लसीचा दुसरा डोस देण्याच्या अभियानाला 13 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली होती. 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांचं लसीकरण सुरु आहे.
भारतातील दुसरी कोरोनाची लाट अधिक भयावह
भारतात कोरोना व्हायरस महामारीची दुसरी लाट सप्टेंबर 2020 मध्ये आलेल्या पहिल्या लाटेहून अधिक भयावह आहे. कारण नव्या लाटेत नव्या कोरोना बाधितांची वाढ झपाट्यानं होत आहे. लैंसेट कोविड-19 कमीशन इंडिया टास्क फोर्सच्या एका रिपोर्टनुसार, फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंत 10,000 ते 80,000 नव्या कोरोनाबाधितांची नोंद 40 दिवसांपेक्षा कमी वेळात झाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)