(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Cases India : देशात कोरोनाचा संसर्ग सुरुच, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2527 नवे रुग्ण, 33 रुग्णांचा मृत्यू
Coronavirus Cases Today in India: आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 2,527 नवे रुग्ण आढळले आहेत. काल भारतात कोरोनाचे 2,380 नवे रुग्ण आणि 56 रुग्णांचा मृत्यू झाला.
Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना संसर्गात मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 2,527 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल भारतात कोरोनाचे 2,380 नवे रुग्ण आणि 56 रुग्णांचा मृत्यू झाला. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजार 79
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजार 79 इतकी झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात देशात 1656 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाखांच्या पुढे गेली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 17 हजार 724 रुग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.03 टक्के इतका आहे.
India reports 2,527 new COVID19 cases today; Active cases rise to 15,079
— ANI (@ANI) April 23, 2022
The daily positivity rate stands at 0.56% pic.twitter.com/iIRQ7CBLzn
आतापर्यंत 187 कोटींहून अधिक लसी देण्यात आल्या
देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 187 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. शुक्रवारी दिवसभरात देशात 19 लाख 13 हजार 296 कोरोना लसी देण्यात आल्या. भारतात आतापर्यंत 187 कोटी 46 लाख 72 हजार 536 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Tina Dabi : IAS टीना दाबी झाल्या महाराष्ट्राची सून, IAS प्रदीप गवांडेंसोबत विवाहबंधनात
- Sri lanka : आर्थिक संकटात श्रीलंकेला दिलासा, जागतिक बँकेची मिळणार मदत
- Viral Video : अचानक आकाशातून समुद्रात कोसळलं विमान, पाहा व्हिडीओ
- Viral Video : सिंहीणीचा शिकारीचा डाव फसला, म्हशींनी केलं धोबीपछाड; पाहा थक्क करणारा व्हिडीओ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha