Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासात 7 हजार 145 नवे कोरोनाबाधित, ओमायक्रॉन बाधितांची संख्या 113 वर
Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 7 हजार 145 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर 289 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या आता 113 वर पोहोचली आहे.
Coronavirus Cases Today in India : देशात कोरोना विषाणूचा (Coronavirus) कहर सुरुच असल्याचं पाहायला मिळतंय. दुसरीकडे देशातील ओमायक्रॉन व्हेरियंटचा (Omicron Variant) संसर्गही वेगाने वाढत आहे़. देशात गेल्या 24 तासांत 24 तासांत 7 हजार 145 नवे कोरोनारुग्ण आढळून आले आहेत. तर 289 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या आता 113 वर पोहोचली आहे.
आतापर्यंत 4 लाख 77 हजार 158 कोरोनाबाधितांचा मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 84 हजार 565 इतकी आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 4 लाख 77 हजार 158 लोकांनी आपला जीव गमावला आहे. शुक्रवारी दिवसभरात 8 हजार 706 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 41 लाख 71 हजार 471 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आतापर्यंत 136 कोटीहून अधिक लसीचे डोस देण्यात आले
राष्ट्रव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेत आतापर्यंत 136 कोटीहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. शुक्रवारी दिवसभरात 62 लाख 6 हजार 244 कोविड लसींचे डोस देण्यात आले आहेत. देशात आतापर्यंत लसीकरण मोहिमेत 136 कोटीहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत.
देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 113 वर
कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमायक्रॉनने चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. देशातील ओमयाक्रॉनबाधित रुग्णांची संख्या शंभरीपलीकडे गेली आहे. सध्या देशातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या 113 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी माहिती दिली की, ''11 राज्यात ओमायक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केला आहे. मागील 20 दिवसांत देशातील दैनंदिन नव्या कोरोना रुग्णांची नोंद दहा हजारांपेक्षा कमी झाली आहे. पण ओमायक्रॉनचं स्वरुप आणि इतर देशातील वाढत्या ओमायक्रॉन रुग्णाची संख्या पाहाता आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे.''
महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron Variant : सावधान! ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये 'हे' प्रमुख लक्षण
- Petrol-Diesel Price Today : आजचे इंधन दर, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत
- Amazon : अमेझॉनला मोठा झटका! CCIकडून मोठी डील रद्द; 202 कोटींचा दंड ठोठावला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha