(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Covid19 Updates : नव्या व्हेरियंटने चिंता वाढवली असताना कोरोनाबाधितांमध्येही वाढ, देशात 2 हजार 141 नवीन रुग्ण
Coronavirus Cases Today : देशात 2 हजार 141 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. एकीकडे नव्या कोरोना व्हेरियंटने चिंता वाढवली असताना देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीतही वाढ झाली आहे.
Coronavirus Cases Today in India : एकीकडे नव्या कोरोना व्हेरियंटने (New Corona Variant) चिंता वाढवली असताना देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीतही वाढ झाली आहे. देशात 2 हजार 141 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची नवीन आकडेवारी जारी केली आहे. कालच्या तुलनेत आज 81 रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली आहे. ही वाढ जरी किंचित असली, तरी देशात आधीच कोरोनाच्या नव्या प्रकाराने डोकं वर काढलं आहे. अशात कोरोना आकडेवारीतील वाढ चिंताजनक आहे.
देशात गुजरातमध्ये BF.7 विषाणूचा पहिला रुग्ण
कोरोनाच्या नवा व्हेरियंट ओमायक्रॉन BF.7 विषाणूचा पहिला रुग्ण भारतात आढळून आला आहे. चीनमध्ये काही दिवसांपूर्वी BF.7 या ओमायक्रॉन विषाणूचा सबव्हेरियंट आढळला होता. भारतातही गुजरातमधील अहमदाबादमध्ये BF.7 व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळला आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरियंट अतिशय संसर्गजन्य असल्याचं म्हटलं जातं आहे.
Single day rise of 2,141 infections pushes India's COVID-19 tally to 4,46,36,517, death toll climbs to 5,28,943: Govt
— Press Trust of India (@PTI_News) October 20, 2022
देशात 26 हजार 583 कोरोना रुग्ण उपचाराधीन
एकीकडे देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे, तर दुसरीकडे सक्रीय रुग्णांचा आकडा 26 हजारांवर कायम आहे. 12 ऑक्टोबरपासून सक्रीय रुग्णांची संख्या 26 हजारांवर कायम आहे. त्याआधी सक्रिय रुग्णांच्या संख्येत सतत घट पाहायला मिळत होती. देशात नव्याने नोंद झालेल्या दोन हजार 141 रुग्णांमुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची आकडेवारी 4 कोटी 46 लाख 36 हजार 517 वर पोहोचली आहे. यापैकी 4 कोटी 40 लाख 68 हजार 557 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.
#Unite2FightCorona
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) October 20, 2022
➡️ 2,141 New Cases reported in last 24 hours. pic.twitter.com/1nfYj4WJnp
आतापर्यंत पाच लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू
देशात आतापर्यंत पाच लाखांहून अधिक रुग्णांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे 5 लाख 28 हजार 943 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोना लसीकरणामुळे कोरोना विषाणूविरोधात लढा देण्यात फार मदत झाली आहे. देशातील लसीकरणात आजपर्यंत 219 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत.