Coronavirus : कोरोना संसर्गात चढ-उतार कायम, देशात 10,256 नव्या रुग्णांची नोंद, सक्रिय रुग्णांची संख्या 90 हजारांवर
Coronavirus Cases Today : देशातील कोरोनाबाधितांच्या संख्या किंचित कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत 10 हजार 256 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना संसर्गामध्ये चढ-उतार कायम आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्या किंचित कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत 10 हजार 256 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आदल्या दिवशी म्हणजे दिवसभरात 10 हजार 725 रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर आज रुग्णांच्या संख्येत किंचित घट झाली आहे. कोरोना रुग्ण संख्येत 469 रुग्णांची घट झाली आहे. गुरुवारी दिवसभरात देशात 13 हजारहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत 13 हजार 528 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनाबाधितांचे प्रमाण जास्त असणे ही दिलासादायक बाब आहे.
देशात 68 कोरोनाबाधितांचा मृत्यू
देशात गुरुवारी दिवसभरात 68 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना महामारी सुरु झाल्यास आतापर्यंत देशात 5 लाख 27 हजार 556 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. केद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन आकडेवारी जारी केली आहे. देशात सध्या 90 हजार 707 सक्रिय रुग्ण आहेत. गुरुवारी दिवसभरात देशात 13 हजार 528 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. देशात एकूण 4 कोटी 37 लाख 70 हजार 913 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
#COVID19 | India reports 10,256 fresh cases and 13,528 recoveries, in the last 24 hours; Active cases 90,707 pic.twitter.com/VnZmWs3FQO
— ANI (@ANI) August 26, 2022
मुंबईत बरे होणाऱ्यांची संख्या अधिक
मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. मुंबईत गुरुवारी 838 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1999 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने आढळलेल्या रुग्णांपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत गुरुवारी 1999 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,16,001 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97.8 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,675 झाली आहे. सध्या मुंबईत 5724 रुग्ण आहेत.
राज्यात गुरूवारी 1887 कोरोना रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 1887 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर गुरुवारी दिवसभरात एकूण 2190 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात सहा कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,30, 793 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.02 टक्के इतकं झालं आहे.