Coronavirus Cases India Today देशात कोरोनाबाधितांच्या विक्रमी आकड्याची नोंद; मृतांचा आकडाही धडकी भरवणारा
देशात कोरोना विषाणूचा आकडा अगदी झपाट्यानं वाढू लागला आहे. नव्या कोरोनाबाधितांचा आकडा काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे
Coronavirus Cases India Today देशात कोरोना विषाणूचा आकडा अगदी झपाट्यानं वाढू लागला आहे. नव्या कोरोनाबाधितांचा आकडा काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. मागील 24 तासांत भारतात एकूण 3 लाख 52 हजार 991 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा ठरत आहे.
एकिकडे रुग्णसंख्या वाढ असतानाच दुसरीकडे 2 हजार 812 कोरोनाबाधितांचा मृत्यूही झाला. सध्याच्या घडीला देशातील सक्रिय रुग्णसंख्या 28 लाख 13 हजार 658वर पोहोचली आहे. रविवारी देशभरात 2 लाख 19 हजार 272 कोरोनाबाधितांनी या संसर्गावर मात केली.
सध्याच्या घडीला देशातील कोरोनास्थिती काय सांगते?
एकूण कोरोनाबाधित - 1 कोटी 73 लाख 13 हजार 163
एकूण मृत्यू- 1 लाख 95 हजार 123
एकूण कोरोनामुक्त - 1 कोटी 43 लाख 4 हजार 382
एकूण लसीकरण- 14 कोटी 19 लाख 11 हजार 223
दिल्लीत लॉकडाऊन कालावधीत वाढ
देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये कोरोनाचा वाढता कहर पाहता या भागात प्रशासनानं लागू केलेल्या लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवण्यात आला आहे. ज्यामुळं आता दिल्लीत 3 मे, सोमवार सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचं नागरिकांना पालन करावं लागणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीच यासंदर्भातील माहिती दिली. यावेळी त्यांनी दिल्लीतील ऑक्सिजन तुटवड्याचाही मुद्दा अधोरेखित केला.
फ्रंटलाईन वर्कर्सना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची चव घेऊन सलमानने घेतला मदतकार्याचा आढावा
महाराष्ट्रातही नव्या कोरोनाबाधितांचा चढता आलेख
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. राज्यात रविवारी 66 हजार 191 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज 61 हजार 450 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 35 लाख 30 हजार 60 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.19 टक्के झाले आहे. राज्यात एकूण 6 लाख 98 हजार 354 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.