(Source: Poll of Polls)
Coronavirus : सावधान! देशात 279 नवे कोरोना रूग्ण; जगभरात वाढतोय कोरोनाचा संसर्ग
Coronavirus Cases in India : भारतातील कोरोना प्रादुर्भावामध्ये सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे. आज देशातील कोरोनाबाधितांची संख्या काहीशी वाढली आहे.
Coronavirus Cases in India : देशात कोरोनाचा (Covid-19) धोका अजूनही संपलेला नाही. भारतातील कोरोना प्रादुर्भावामध्ये सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे. आज देशातील कोरोनाबाधितांची संख्या काहीशी वाढली आहे. गेल्या 24 तासांत 279 नवीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर, एकही कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. दरम्यान देशातील कोरोना संसर्ग किंचित घटला असला, तरी धोका कायम आहे. जगभरात चीन, जपान आणि ब्राझीलसह अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. चीनमधील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनाकडून कोरोना विषाणूकडे दुर्लक्ष न करता काळजी घेण्याचं आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन केलं जात आहे.
Single-day rise of 279 new COVID-19 cases push India's infection tally to 4,46,72,347, death toll climbs to 5,30,620: Govt
— Press Trust of India (@PTI_News) November 30, 2022
देशात सक्रिय रूग्णांची संख्या
देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच मंगळवारी हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 4,46,72,347 वर पोहोचली आहे. देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार हजारांवर आहे. देशात सक्रीय कोरोना रूग्णांची संख्या चार हजार 855 वर पहोचली आहे. देशात 219 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा वेग कमी करण्यात मदत झाली आहे.
Count of active COVID-19 cases in India stands at 4,855: Union Health Ministry
— Press Trust of India (@PTI_News) November 30, 2022
चीनमधील कोरोनाची स्थिती काय?
जगभरात पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोकं वर काढताना दिसत आहे. चीन, जपान, ब्राझीलमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढल्याचं दिसत आहे. चीनमध्ये रविवारी एका दिवसात 40 हजार रुग्णांची नोंद झाली. त्या आधी सलग तीन दिवस 30 हजारांहून अधिक रुग्ण आढळले होते. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता प्रशासनाने अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन जारी केला आहे. मात्र जनतेकडून लॉकडाऊनला विरोध करण्यात येत आहे. रविवारी झालेल्या निदर्शंन आणि आंदोलनात 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या :
Petrol Diesel Price: आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर; तुमच्या शहरांत एक लिटर पेट्रोलचे दर काय?