Coronavirus Updates : धोका वाढतोय! देशात कोरोनाचे 12 हजार 847 नवे रुग्ण, 14 जणांचा मृत्यू
Coronavirus Cases Today : देशात कोरोनाचा वाढता धोका कायम आहे. गेल्या 24 तासांत भारतात 12 हजार 847 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases Today in India : देशात कोरोनाचा वाढता धोका कायम आहे. गेल्या 24 तासांत भारतात 12 हजार 847 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाच्या संसर्गात सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहता कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकीकडे सरकारकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. तर दुसरीकडे जगभरात पसरलेल्या मंकीपॉक्स व्हायरसच्या धोक्यामुळेही आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. देशात गुरुवारी दिवसभरात 14 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर, 7 हजार 985 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून मुक्त झाले आहेत.
महाराष्ट्रात सक्रिय रुग्ण 20 हजारांच्या पुढे
गुरुवारी महाराष्ट्रात 4 हजार 255 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुधवारी राज्यात 4024 रुग्ण आढळले होते. त्या तुलनेत आज राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ आहे. दिलासादायक बाब म्हणजे, मागील 24 तासात 2879 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनामुक्ताची संख्या 77 लाख 55 हजार 183 इतकी झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) 97.87% एवढे झाले आहे. सक्रिया रुग्णांची संख्या 20 हजारांच्या पुढे पोहोचली आहे.
मुंबईत एकाच दिवसात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) प्राणघातक कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात कोरोनाचे 2366 नवे रुग्ण आढळले आहेत. तेथे दोन जणांचा मृत्यू झाला. मोठी गोष्ट म्हणजे या वर्षी 22 जानेवारीनंतर मुंबईत एकाच दिवसात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. 22 जानेवारी रोजी कोरोनाचे 2550 रुग्णसंख्या नोंदवली गेली आणि त्यानंतर 13 लोकांचा मृत्यू झाला. जाणून घ्या मुंबईतील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Covid-19 Vaccine : कोविड बूस्टर डोसमधील अंतर कमी होणार? मंकीपॉक्स संदर्भातही महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता
- Edible Oil Price Reduced : खुशखबर! महागाईतून दिलासा, खाद्यतेलाच्या दरात कपात
- National Herald Case : राहुल गांधी आज ईडी चौकशीला गैरहजर राहणार, आई सोनिया गांधींसोबत हॉस्पिटलमध्ये थांबण्यासाठी मागितली परवानगी