(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Cases Today : देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट, गेल्या 24 तासात 10 हजार 273 रुग्णांची नोंद, 243 जणांचा मृत्यू
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे 10 हजार 273 नवीन रुग्ण आढळले असून 243 जणांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases Today in India : देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 10 हजार 273 नवीन रुग्ण आढळले असून 243 लोकांचा मृत्यू झाला आहे. काल 11 हजार 499 कोरोना रुग्ण आढळले होते. म्हणजेच कालच्या तुलनेत आज रुग्ण कमी झाले आहेत. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 11 हजार 472 इतकी कमी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 11 हजार 472 इतकी कमी झाली आहे. तर कोरोना महामारीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 13 हजार 724 झाली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 22 लाख 90 हजार 921 लोक कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत.
आतापर्यंत सुमारे 177 कोटी डोस देण्यात आले
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे सुमारे 177 कोटी डोस देण्यात आले आहेत. शनिवारी दिवसभरात 24 लाख 5 हजार 49 लसींचे डोस देण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत 177 कोटी 44 लाख 8 हजार 129 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धे आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 1.99 कोटी (1,99,77,476) पेक्षा जास्त प्रतिबंधात्मक लस देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : बॉम्बस्फोट आणि तोफांच्या आवाजातच चिमुकलीचा जन्म, युक्रेन सरकारनं नाव ठेवलं 'स्वातंत्र्य'
- Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेले 250 विद्यार्थी दिल्ली विमानतळावर पोहोचले, एअर इंडियाचं दुसरं विमान भारतात दाखल
- Pune Marathon : देशात पहिल्यांदाच रात्रीच्या वेळी मॅरेथॉन स्पर्धा; पुण्यात आयोजन, देशविदेशातील धावपटूंचा सहभाग
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha