Covid19 : रुग्ण वाढले, धोका कायम; सक्रिय रुग्णांची संख्या 13 हजारांवर
Coronavirus in India : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आज वाढ झाली आहे. आज देशात 1016 नवे रुग्णांची नोंद आणि दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases in India : देशातील कोरोनाबाधितांच्या ( Coronavirus in India ) संख्येत आज वाढ ( Hike in Covid19 Cases ) झाली आहे. आज देशात 1016 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून दोन रुग्णांचा मृत्यू ( Two Covid19 Patient Death ) झाला आहे. काल ही संख्या 811 इतकी होती. या तुलनेनं आज 205 कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. देशातील कोरोना उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 13 हजारांवर आहे.
महाराष्ट्रात 130 नवे रुग्ण
राज्यात गेल्या 24 तासांत 130 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रात 1320 सक्रिय रुग्ण आहेत, शिवाय दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबई गेल्या 24 तासांत 46 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत आणि एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
Single day rise of 1,016 new coronavirus infections push India's COVID-19 tally to 4,46,63,968, death toll climbs to 5,30,514: Govt
— Press Trust of India (@PTI_News) November 10, 2022
लहान मुलांमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग
सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढत आहे. अमेरिकेत रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये सहा महिन्यांपेक्षी कमी वयाचे रुग्ण अधिक आहेत. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (CDC) गर्भवती महिलांना लसीकरण करण्याचे आवाहन केलं आहे. यामुळे लहान मुलांना संसर्गाचा धोका कमी होईल.
देशात एकूण 5,30,514 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू
भारतात गेल्या 24 तासांत एक हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. यासह देशातील कोरोना झालेल्या एकूण रुग्णांची संख्या चार कोटी 46 लाख 63 हजार 968 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत सुमारे साडे पाच लाख रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना महामारी सुरु झाल्यास देशात एकूण 5 लाख 30 हजार 514 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सुमारे चार कोटीहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
जगभरात कोरोनाचा संसर्ग सुरुच, चीनमध्ये लॉकडाऊन
भारतातच नाही तर जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरुच आहे. कोरोनाचं उगम स्थान समजलं जाणाऱ्या चीनमध्येही पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय. दररोज चीनमध्ये नवीन कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर चीनमधील काही शहरांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे अनेक उद्योगधंद्यांनाही फटका बसला आहे.